spot_img

पुणे येथील येरवडा कारागृहात राष्ट्रसंतांच्या भजनांचा कार्यक्रम संपन्न* *श्री. गुरुदेव सेवा मंडळ पुणे व श्री .गुरुदेव सेवा मंडळ श्री.क्षेत्र देहू. यांचा स्तुत्य उपक्रम*

पुणे : दिनांक ७ जानेवारी १९५१ ला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे ला भेट दिली होती. याचे स्मरण म्हणून व महाराजांच्या तत्त्वज्ञान प्रचारार्थ उद्देशाने ‘श्री गुरुदेव सेवा मंडळ, पुणे’ व ‘श्री गुरुदेव सेवा मंडळ, देहू’ या संस्थांनी संयुक्तपणे दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हिंदी व मराठी भजनाचा कार्यक्रम सादर केला

या कार्यक्रमात श्री प्रवीण कुरळकर, श्री सुनील निंभोळकर, श्री सुरेश देसाई, प्राध्यापक सुरेंद्र गोविंदराव नावडे, श्री गणेश जाधव, श्री सुभाष जाधव, श्री गणेश फुरसुले, श्री बाबा ढोणे, श्री विलास महल्ले, श्री सुरेश बावनकर, श्री शिवलिंग गुरव व श्री यशवंत भेलके राष्ट्रसंतांचे हे अनुयायी सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रसंतांचा युगप्रवर्तक हिंदी व उर्दू भाषेतील ‘ग्रामगीता’ ग्रंथ व ‘गांधी गीतांजली’ भजन संग्रह कारागृह ग्रंथालयाला देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग ), कारागृह अधिक्षक व उपअधिक्षक यांचे सहकार्य मिळाले.
दिनांक २२ सप्टेंबर २०१८ रोजी हाच कार्यक्रम मध्यवर्ती कारागृहात करण्यात आला होता.
या कार्यक्रमातील सहभागी राष्ट्रसंताचे अनुयायी विदर्भातील असून नोकरी व व्यवसायानिमित्त पुणे व देहू परिसरात वास्तव्यास आहे .

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या