spot_img

**पितृपक्ष म्हणजे जुन्या पिढीचा आशीर्वाद घेऊन सुखी जीवन जगणे**

पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय. हा भाद्रपद
महिन्यातला कृष्ण पक्ष असतो, यास ‘महालय’असेही नाव आहे.आपल्या नातेवाईकांचा मृत्यू ज्या तिथिस झाला असेल, त्या नातेवाईकांचे श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीत करण्याची हिंदू परंपरा आहे.या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. पितृपक्ष श्राद्ध हा हिंदू धर्माचा एकविधीचा आचार असून त्याला वेदकाळाचा आधार आहे. व्यक्तीच्या माहितीनंतर आत्म्याला सद्वती घ्यावी. म्हणून पितृपक्ष श्राद्ध करणे हे हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे.प्रतीवर्षी भाद्रपद मासले कृष्पक्षात महालय श्राद्धकेले जाते. श्राद्ध म्हणजे काय आणि त्याविषयी श्रद्धेचा सिद्धांत, व्याख्या, तसेच श्रद्धपक्ष हा शुभकार्यासाठी निषिद्ध मानला. ‘देवकार्य महिला पितृकार्य श्रेष्ठ कसे,’ श्राद्ध हे धर्म,अर्थ आणि कार्यशात्र प्राप्ती करून देते. आपल्याला यावरून हिंदू धर्माचे महत्त्व लक्षात येईल.अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला पितृपक्ष संपतो. हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्व असते. या काळात आपल्या पितरांच्या आत्मशांती साठी पूजन केले जाते. तसेच काही उपाय देखील करतात. या उपायांनी आपला पितृदोष नाहीसा होतो अशी मान्यताआहे. पितृपक्ष हा 15 दिवस असतो. यामध्ये पितरांचे पूजन केले जातात यासाठी या काळात आपले पितृदेव आपल्याकडे जेवणासाठी येतात.त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितृ प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबावर कृपा करतात. यामुळे आयुष्यात सुखशांती येते असे म्हणतात.पितृपक्ष भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमा रविवारी 7 सप्टेंबर 2025 पासून सुरू होऊन त्याची समाप्ती अश्विन कृष्णपक्षा अमावस्या रविवार 21 सप्टेंबर 2025 ला आहे. पितृपक्षात आपल्या पितरांच्या शांतीसाठी अनेक उपाय करून पितरांची कृपा व पितृदोष नाहीसा होते अशी मान्यता आहे. पितृपक्षाची संबंधित कथा आहे मृत्यूनंतर स्वर्गात गेल्यावर कर्णाला काय खायला मिळाले जाणून घ्या, पितृपक्षाची संबंधित कथा भाद्रपद कृष्ण पक्षातील पौर्णिमेपासून भाद्रपद महिन्याच्या अमावस्येपर्यंत 16 दिवसाच्या पितृपक्षात केले जाणारे श्राद्ध आपल्या सनातन परंपरेचा एक भाग आहे. महाभारत काळात द्वापार युगात श्राद्धाचा तपशीलवार उल्लेख आहे. महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामहआणि युधिष्ठिर यांच्यातील श्राद्धाविषयी सविस्तर चर्चा आहे. महाभारत काळात श्राद्धाचा पहिला सल्ला अत्री मुनींनी महर्षी निमी यांना दिला होता. हे ऐकून निमी ऋषींनी आपल्या मुलाचे श्राद्ध केले. याशिवाय, महाभारताच्या युद्धानंतर, श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून, पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध सोमवती अमावस्येच्या दिवशी करायची होते. जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा. पण त्यांच्या हयातीत सोमवती अमावस्या कधीच आली नाही. यामुळे संतापलेल्या युद्धिष्टीरणे सोमवती अमावस्याला शाप दिला की, यापुढे सोमवती ‘अमावस्या’ वर्षातून एकदाच येईल, इतकेच नाही तर याआधी त्रेता युगात सीतेने दशरथाला पिंडदान राजाला पिंडदान दिल्याची कथाही प्रसिद्ध आहे. पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे असे मानले जाते की, कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले. कर्णाला अन्ना ऐवजी सोने का दिले जात आहे हे समजले नाही. त्याने हे देवराज इंद्राला अशी वागणूक का दिली, असा प्रश्न केला. तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे. काहीही अन्न किंवा पाणी दान केले नाही इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही. हे ऐकून कर्नाणे सांगितले की, त्याला त्याच्या पूर्वजाबद्दल काहीही माहिती नाही म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान कधीच केले नाही. हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला 16दिवसासाठी पृथ्वीवर परत पाठवले. पृथ्वीवर आल्यावर कर्नाणे भक्ती भावाने आपल्या पीतरांची श्राद्ध केले आणि अन्न, पाणी, वस्त्र दान केले. असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले. पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे 16 दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले असे मानले जाते. श्राद्ध केल्याने मोक्षप्राप्ती होते,तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते. असे मानले जाते. वडिलोपार्जित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे पितर तहानलेले राहतात त्यामुळे काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पन केल्याने पितरांना विशेष समाधान मिळते. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्य करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे असे धर्मशास्त्र सांगते. देवपितृकार्या भ्यम न प्र्मदित्तव्यम!देव आणि पितर यांच्या हेडसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे.दिवंगत पुर्वज्यांचे पिंडरुपाने स्मरण पूजन करण्याची परंपरा आहे यामध्ये दिवंगत आई-वडील,आजी- आजोबा, पणजी- पंजोबा,सावत्र नातेवाईक, भाऊ, बहीण, काका- काकू, मामा- मामी,मावशी,आत्या, सासू-सासरे,व्याही, विहीन अन्य नातेवाईक या सर्वांना पिंडदान करतात. आपण विविध गुरुकडून आयुष्यभर काहीना काही शिकत असतो आणि काही लोकांना पण शिकवतही असतो, त्यामुळे या निमित्ताने निधन पावलेले आपले गुरु आणि शिष्य यांचेही आपण स्मरण करतो. आपले हितचिंतक स्नेही अन्य आप्त आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही याच स्मरण होते. जगाच्या पाठीवर दिवंगत असलेल्या आपल्या ओळखीच्या एवढेच नव्हे तर अनोळखी असलेल्या दिवंगत व्यक्तींना ते करतात जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात. पूर्व,पश्चिम, दक्षिण, उत्तर या दिशांना चार धर्मपिंडे देण्याची पद्धत विशेष करून आहे. या चार दिशांना मृत झालेल्या जीवांसाठी यजमान हे पिंडदान करतात. महालय श्राद्धात क्षणदान, अर्घादान, पूजा,अगंनौकरण, पिंडदान, विकीरदान,स्वधावाचन वगैरे विधी करायचे असतात.योग्य तिथीवर महालय करणे अशक्य झाल्यास पुढे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही योग्य तिथीला महालय केला तरी चालतो. भाद्रपद अमावस्येला मातासह श्राद्ध (आई-वडिलांचे श्राद्धा) असतेच पण याशिवाय या दिवशी ज्यांचा मृत्यू दिन नक्की माहीत नाही त्या सर्वच पितरांचे श्राद्ध करण्याचाही प्रघात आहे. तसेच महालयातील विशिष्ट तिथींना करण्यात येणारे श्राद्ध कोणत्याही कारणाने किंवा अडचणीमुळे राहिले असेल तर या दिवशी करता येते.(परंतु आपण आज कलियुग पाहतो आहे. आई वडिलांची सेवा न करता नंतर कितीही पितरांची पूजन, स्वादिष्ट भोजन, पूजा, पाठ केली तरीही ति पावन नाही. जी सेवा जिवंत असतांनी केली तीच पावन असते व आशीर्वाद देऊन पूर्वज जात असते. म्हणून त्यांनी आपल्याला लहानपणापासून जपले त्यांना कमीतकमी म्हातारपणी लहानासारखे जपा व जेष्ठाचा आदर व सेवा करा. जुनी रूढी, परंपरा कराच हे आपले हिंदू धार्मियांचे ते महत्वाचे कार्य आहेच. पण पहा सेवा कराच मग पितरांची सेवा,पूजनपावन होईलच.)चला तर
संकलन :-शेषराव कडू
वरुड मो.नं.9923988734

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या