spot_img

वाढदिवसानिमित्त माननीय दिवे साहेबांचे हार्दिक अभिष्टचिंतन*💐 व्यापक दृष्टिकोन…उत्तम प्रशासन…गतिशील कृती…सर्वसमावेशक शैली…कामाशी निष्ठा..आणि पदाची प्रतिष्ठा जोपासनारा नेता म्हणजे श्री सुधिर वामनराव दिवे..!

*वाढदिवसानिमित्त माननीय दिवे साहेबांचे हार्दिक अभिष्टचिंतन*💐

व्यापक दृष्टिकोन…उत्तम प्रशासन…गतिशील कृती…सर्वसमावेशक शैली…कामाशी निष्ठा..आणि पदाची प्रतिष्ठा जोपासनारा नेता म्हणजे श्री सुधिर वामनराव दिवे..!

आमचे मित्र श्री अजयजी भोकरे यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीचा घेतलेला आढावा त्यांचेच भाषेत येते प्रस्तुत करित आहो.

मा.आदरणीय श्री. दिवे साहेब…
आपला वाढदिवस हा केवळ जीवनातील एका नवीन वर्षाचा प्रारंभ नाही, तर समाजसेवा, कृषीउन्नती, गौरक्षण आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यातल्या आपल्या अथक प्रयत्नांचा, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा आणि प्रेरणादायी प्रवासाचा उत्सव आहे.
आज २१ सप्टेंबर २०२५ रोजी, आपल्या कार्यतत्परतेमुळे असंख्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेला विश्वास, आशा आणि प्रेरणेचा सन्मान करण्याची ही सुवर्णसंधी आहे.

भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे माजी सरचिटणीस आणि महाराष्ट्र भाजपाचे राज्य कार्यकारी सदस्य म्हणून आपण “राजकारण हे समाजसेवेचे साधन आहे” या तत्त्वज्ञानाची प्रखर जपणूक केली आहे. शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या हितासाठी आपण उचललेली पावले आज अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.
पूर्ती पॉवर अँड शुगर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून उद्योग क्षेत्रात नवे मापदंड स्थापित करताना, स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण सामाजिक कार्यातही समर्पितपणे झोकून दिलेले योगदान अनुकरणीय आहे.

विशेषतः, वर्धा जिल्ह्यातील धानोली येथील गौशाला, देसी गायींचे संवर्धन, आणि भ्रूण प्रजनन तंत्राद्वारे गिर जातीच्या वासराचा जन्म या आपल्या दूरदृष्टीपूर्ण प्रयत्नांमुळे गौरक्षण क्षेत्रात नवे युग आरंभले आहे. महाराष्ट्र पशुसंवर्धन आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवरील आपली नियुक्ती हे गौरक्षण व कृषीक्षेत्रातील आपल्या तज्ज्ञतेचे जिवंत प्रतीक आहे. आपल्या प्रत्येक कृतीतून शेतकरी सक्षमीकरण, ग्रामीण विकास आणि पर्यावरण संरक्षणाचा प्रेरणादायी संदेश समाजापर्यंत पोहोचतो.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा युतीचे उमेदवार मा. श्री नितिनजी गडकरी यांचे प्रचाराची धुरा असो.. त्यानंतर सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीत आर्वी मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार मा. श्री सुमितजी वाणखेडे यांच्या प्रचाराची धुरा असो.. आपल्या कल्पक आणि परिश्रमपूर्वक नियोजनाने उमेदवारांचा विजय सुनिश्चित करून दिला. नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचे वतीने आपली “पदवीधर मतदार नोंदणी सहप्रमुख” म्हणून परवा प्रदेशाध्यक्षांनी केलेली आपली नियुक्ती ही आपल्यातल्या उत्तम संघटन कौशल्याची नी उमेदवाराच्या हमखास विजयाची खात्री म्हटले तर वावगे ठरू नये.

आपला हा वाढदिवस आपल्या सेवायात्रेला नवचैतन्य देणारा ठरो..
ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सतत यश प्रदान करो, आणि आपल्या नेतृत्वाची प्रेरणा समाजातील प्रत्येक हृदयात नवी उमेद जागवो, हीच मनःपूर्वक प्रार्थना 🙏🙏
आपला हा खास दिवस आपल्या कुटुंबिय, सहकारी आणि असंख्य शुभेच्छुकांसमवेत आनंद, अभिमान आणि उत्साहाने साजरा होवो, हीच सदिच्छा 😘

पुन्हा एकदा, वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा 🎉💐💐

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या