spot_img

तळेगाव (शा. पंत) येथील मानव विकास ज्ञान साधनाश्रम चे व्यवस्थापक आचार्य प्रफुल दादा अनंतात विलीन* *श्रीलंका येथे अपघातात मृत्यू* *लाखो अनुयांना अश्रू अनावर*

तळेगाव शा.पंत
दि.25/9/2025

एक वर्षाच्या ‘धम्म विनय’या साधनेसाठी श्रीलंकेला गेलेले तळेगांव(शा.पंत) ता. आष्टी जि. वर्धा येथील मानव विकास ज्ञान साधनाश्रमचे व्यवस्थापक,आचार्य श्री प्रफुलदादा ऊर्फ प्रदीप लक्ष्मणराव वाघदरे( वय ३४)रा. ब्राम्हणवाडा पो. मासोद ता. आर्वी जि. वर्धा श्रीलंकेत झालेल्या केबल कार अपघातात देवाज्ञा झाली.

*नेमकं काय घडलं?*
अपघाताच्या वेळी मठात 13 बौद्ध भिक्षू केबल कारमधून प्रवास करी होते असे वृत्त आहे. केबल कारची केबल तुटून पडल्याने किमान सात बौद्ध भिक्षूंचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. कुरुनेगाला रुग्णालयातील सूत्रांनी अदा डेराना यांना सांगितले की, मेल्सिरीपुरातील पानसियागामा येथील ना उयाना मठात (ना उयाना अरण्य सेनानाया) केबल कारची केबल तुटून खाली पडल्याने किमान सात बौद्ध भिक्षूंचा मृत्यू झाला आहे. सूत्रांनी सांगितले की, काल रात्री (२४) कुरुनेगाला येथील बौद्ध वन मठात झालेल्या अपघातावेळी केबल कारमध्ये सुमारे १३ बौद्ध भिक्षू प्रवास करीत होते त्यापैकी ७ भिक्षुंचा मृत्यू झाला.

मृत पावलेल्या भिक्षूंमध्ये आपले प्रफुलदादा होते. दादांचे पार्थिव श्रीलंका येथून तळेगाव आश्रम मध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. दादांना भावपूर्ण आदरांजली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या