दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. जागतिक पातळीवर ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाला सन्मान देण्यासाठी आणि त्यांना भेडसावणाऱ्या जागरूकता निर्माण करण्यासाठी, जेष्ठ नागरिकांच्या सन्मानाने आणि कल्याणाने जगण्याचा अधिकार जपला जातो. त्यांच्या अनुभवांचा आणि ज्ञानाचा आदर केला जातो. त्यांचे आरोग्य,आर्थिक अडचणी, सामाजिक एकाकीपणा याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करतो. जेष्ठ नागरिकांनी समाजाला दिलेल्या अनुभवांचे आणि ज्ञानाचे कौतुक करण्यासाठी, सन्मानित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.या दिवशी जेष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क विषयी आणि उपलब्ध असलेल्या योजना बद्दल माहिती दिली जाते. ज्येष्ठ नागरिकांना समाजात सक्रिय ठेवण्यासाठी आणि त्यांना सशक्त बनण्यासाठी शासनाच्या विविध योजना बद्दल माहिती देऊन प्रोत्साहन दिल्या जाते. जेष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पूर्ण दिवस आहे. वृद्धांना प्रभावित करणाऱ्या घटका पर्यंत पोहोचवतात आणि समस्या बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी जसे की आरोग्य बिघडणे आणि वृद्धावर होणारे अत्याचार समाजात वृद्धाचे योगदान ओळखण्यासाठी आणि त्यांची कबुली देण्यासाठी हा दिवस आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन त्याची अधिकृत स्थापना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी केली होती. ज्यांनी त्यांचे आयुष्य हे काही साध्य केला आहे आणि ते जे काही करत आहे त्याबद्दल आम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिकांना कृतज्ञता आणि प्रामाणिक शुभेच्छा देतो.आमचे समुदाय चांगले ठिकाण आहे याची खात्री करून आम्ही आमची कृतज्ञता आणि कौतुक अधिक चांगल्या प्रकारे दाखवू शकतो. अशी ठिकाणी येथे वृद्ध लोक शक्य तितके सहभागी होऊ शकतात त्यांना स्वातंत्र्य आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले प्रोत्साहन स्वीकृती समर्थन आणि सेवा मिळवू शकता. जागतिक जेष्ठ नागरिक दिन नागरिकांनी त्यांच्या आयुष्यात दिलेल्या सेवा कामगिरी आणि समर्पणाबद्दल साजरा करण्याची आणि त्यांचे कौतुक करण्याची संधी आहे. भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकांची स्थान नेहमीच मानाचे राहिले आहे कारण ते परिवाराचा आधारवड असल्याने त्यांना अनमोल ठेवावी म्हटला जातो. त्यांच्या छत्रछायेत लहानाचे मोठे झालेल्या प्रत्येक सदस्यांनी त्यांना सन्मानाची आदराची वागणूक देने खऱ्या अर्थाने कर्तव्यच आहे. एकदाही विसरू नये कारण आजच्या पिढीने एक गोष्ट लक्षात ठेवावी की तुम्ही जशी वागणूक तुमच्या आई-वडिलांना देता ना तशीच पुढे तुमची मुलं तुम्हाला देतील. आपल्या आयुष्याची संध्याकाळ हे कधी व कुठे होईल याचा अंदाज आपण बांधू शकत नाही. आपण केलेले कार्य परत फिरून कधी ना कधी आपल्यासमोर उभी राहतात, कारण म्हणतात ना करावे प्रत्येकाला काळानुरूप वृद्धार्पकाळाला सामोरे जावेच लागते. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपल्या घरातील वडीलधारी मंडळीशी आपलेपणाच्या भावनेने वागावे. त्यातच तुमची भलाई आहे. आणि जीवनाची सार्थकता आहे. प्रत्येकाने एकमेकाचा आधार म्हणून जीवनाचा झाला पाहिजे, जेणेकरून भावी पिढीवर चांगले संस्कार पुढे आदर्श नागरिक म्हणून समाजाला योग्य दिशा देतील. शरीर साथ न देणे, सुरकुत्या पडलेली ती त्वचा,कमजोर झालेली नजर, कानाला ऐकू येत नसले तरी देखील सर्व काही जाणणारी ही मंडळी तथापि सर्वांनी हसतखेळत सुखी आनंदी व समाधानी राहावे हाच खरा त्याचा मानस असतो. घराघरातील वडीलधारी मंडळींचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा हेच अपेक्षित आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात जे की सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधून पाहे थोडक्यात समाधानी वृत्ती बाळगणे हे यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. वाद विवाद निर्माण होऊ नये यासाठी सर्वांना समान वागणूक देऊन ज्येष्ठांनी त्यांच्या मतांचा सन्मान करावा अतिरंगी विचार न मांडता गोष्टी सांगणे युक्तीच्या चार ही भूमिका कुटुंबात वावरताना नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर्वांना ज्येष्ठ या नात्याने समान पहावे.मीच श्रेष्ठ बाकीचे दुय्यम आम्हीपणा कटाक्षाने टाळावा, जुन्या नव्या पिढीतले अंतर लक्षात घेऊन एखाद्या मुद्द्यावर सल्ला विचारला तरच तो द्यावा विनाकारण प्रत्येक ठिकाणी लूटबुट करू नये, जिथे आपली गरज नसेल तिथे मौन पाडणे सर्वोत्तम माध्यम आहे. त्यामुळे आपल्या मताला किंमत राहते प्रत्येक घरात लहान मोठ्या सदस्यांमध्ये म्हणजेच वातावरण तयार होते. नटसम्राट या नाटकाबाबत सांगितल्याप्रमाणे मुलांना आपले समोरचे ताट द्या परंतु पाठ देऊ नका या अनुषंगाने वागावे. भावनावश होऊन हात पायपणाने आपले सर्वच मुलांना देऊन टाकू नका हे तुमचे आयुष्याची कमाई आहे. मृत्युपत्र लिहून ठेवावे म्हणजे आपण देवा घरी गेल्यावर कौटुंबिक सदस्य मालमत्तेवरून वाद भांडणे होणार नाही. ज्येष्ठाच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टीने विचार करायचा आपल्या जिभेवर ताबा ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे सिमित आहार झेपेल एवढा व्यायाम आणि पुरेशी विश्रांती असा दैनंदिन कार्यक्रम असावा,या जन्मावर जगण्यावर शतदा प्रेम करावे या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या अर्थपूर्ण संदेशाचे मर्म लक्षात घ्या ज्येष्ठ स्त्री-पुरुषांनी आपल्या उर्वरित आयुष्याची मार्गक्रमणा करावी जेणेकरून तुमचे आमचे जीवन सुखी आनंदी व आरोग्यदायी होईल हे निश्चित आम्ही म्हातारे नव्हे तर महा-तारे याची मनात गाठ बांधून कोणाच्या सहाऱ्यावर विसंबून न राहता तुम्ही दुसऱ्याचे आधारवड बना कारण आपण सर्वजण वृद्ध नव्हे तर ज्येष्ठ. ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने अनेक उपक्रम सुरू केले आहे त्यामुळे त्यांना गोष्टीचा लाभ घेणे आणि प्रवेश करणे सोपे झाले आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने सुद्धा आणि एक योजना जाहीर केलेल्या आहे दारिद्र रेषेखालील आणि ज्यांना पेन्शन नाही,अल्प उत्पन्न गटातील ज्येष्ठ नागरिक आहे. त्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावण वाढ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती योजना यांचा लाभ मिळतो. देशाच्या जळण घडणीत जेष्ठ नागरिकांचे मोठे योगदान आहे.अंगणात तुळशी वृंदावनाशिवाय शोभा नाही तसेच घरात थोर व्यक्ती असल्याशिवाय घराला घरपण नाही. प्रत्येकाला वृद्धत्व हे येणारच जन्मापासून मृत्यू पर्यतच्याप्रवासात विविध रूपे येतात. वृद्ध हा एक त्यातील टप्पा आहे शेवटी म्हातारपण येऊन कौटुंबिक आधार प्रत्येकाला हवा असतो. चढत्या व उतरत्या अवस्थेत ते देशाचे थोर आधारस्तंभ असतात. जेष्ठा प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांना सदैव प्रेम सहकार्य मिळावे हीच देवाच्या चरणी प्रार्थना करतो.
संकलन :-शेषराव कडू
मो. नं. 9923988734