spot_img

लहान आर्वी येथील कु. श्रेया बाबरे ब्रिस्टाॅल विद्यापीठाकडुन १५ लक्ष रूपये स्काॅलरशीपची मानकरी* *लंडन शाखा येथे अभियंता म्हणुन रूजु*

*लहान आर्वी येथील कु. श्रेया बाबरे ब्रिस्टाॅल विद्यापीठाकडुन १५ लक्ष रूपये स्काॅलरशीपची मानकरी*

*लंडन शाखा येथे अभियंता म्हणुन रूजु*

*आष्टी (शहीद) :-*

येथुन नजीकच असलेल्या लहान आर्वी येथील कु. श्रेया जयंतराव बाबरे या मुलीने कॉम्प्यूटर इंजीनियरींग मधून पदवी परीक्षा उतीर्ण करून याच क्षेत्रात एम. एस. (M.S.) या पदवीत्तर उच्च शिक्षणासाठी एन्टरन्स परीक्षा पास केली. सर्व देशातील नामाकितं “ब्रिस्टल” या विद्यापीठात प्रवेश मिळवला. अभासक्रमा मध्ये कु.श्रेया बाबरे हीने चार विषयात डीस्टीक्शन (D.T.) मिळवून “ब्रिस्टाॅल विद्यापिठाची” उत्कृष्ट विद्यार्थीनी म्हणून किताब पटकावला. याबद्धल “ब्रिस्टाॅल” विद्यापिठाने तिला १५ लक्ष रूपये स्काॅलरशीप आणि प्रमाणपत्र देवून पुरस्कार सन्मानित केले.कु.श्रेया बाबरे ही नुकतीच २९ सप्टेबर रोजी जागतिक स्तरावर अमेरिकेच्या नावाजलेल्या कंपनी मध्ये उच्च पदावर रुजू होवून “लंडन शाखेमध्ये” सेवा देत आहे. तिच्या स्व-प्रयत्नाने तिने मिळवलेल्या यशा बाबत अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सजिंता मोहपात्रा (भाप्रसे) यांनी कु. श्रेया बाबरे हीचा “तू इतर मुली साठी प्रेरणादायी ठरणारी आहे ” असे गौरवपुर्ण उद्गार काढून तिचा सन्मान केला. तीचा आनंद द्विगुणीत करून तीच्या पुढील यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात तीच्या सोबत वडील जयंतराव बाबरे आणि आई सौ. नलीनी बाबरे उपस्थित होत्या.
आष्टी तालुक्यातील लहान आर्वी सारख्या छोट्या गावाचे नाव कु. श्रेया जयंतराव बाबरे हीने जागतिक स्तरावर नेऊन मोठे केलेलेआहे. कु. श्रेया हीचे वडील सेवानिवृत्त (श्रेणी-१) चे गटविकास अधिकारी असुन ,आई अमरावती पंचायत समिती मध्ये शिक्षण विभागात “समुह साधन व्यक्ती” म्हणून कार्यरत आहे. तिला या यशस्विते करीता आत्या श्रीमती प्रतिक्षा बाबरे व भाऊ चि.स्वराज बाबरे यांनी मोलाचे मार्गदर्शन तथा सहकार्य केले.
कु. श्रेया बाबरे हीने लहान आर्वी गावाचे नाव जागतिक स्तरावर नेऊन पोहोचविले असल्याने तीचे लहान आर्वी गावात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.यामुळे कु. श्रेया बाबरे हीचे सरपंच सुनिल साबळे, उपसरपंच अमोल होले, पोलीस पाटील देवानंद पाटील यांनी अभिनंदन केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या