spot_img

महायुतीचे नेते मा.आमदार सुमीतदादा वानखेडे यांची भेट*: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना महायुती व जागा वाटपा संर्दभात सकारात्मक चर्चा. *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ. प ) ची आर्वी न.प च्या महायुतीतील 10 जागेसाठी आग्रही मागणी*

आर्वी:आगामी नगर परिषद व जिल्हा परिषद-पचायत समीती स्थानिक स्वराज्य संस्था* *निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे नेते मा.आमदार सुमीतदादा वानखेडे यांची महत्त्वपूर्ण भेट घेऊन महायुतीची रणनीती, उमेदवारांची निवड आणि वार्ड निहाय्य नियोजना बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली*
*चर्चेमधे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुती तील घटक पक्षांच्या समन्वयावर भर देण्यात आला*
*स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी साठी सक्षम आणि लोकप्रिय उमेदवारांची निवड करण्यावर भर देण्याचे एकमत झाले, प्रत्येक वार्डातील स्थानिक मुद्दे आणि *विकासकामे यांचा आढावा घेऊन प्रभावी प्रचाराची रननीती तयार करण्यावर एकमत झाले*.*आमदार सुमीतदादा वानखेडे यानी सामाजिक कल्याणकारी योजनांवर भर देत महायुतीच्या माध्यमातून लोककल्याणाचा व विकासाचा अजेंडा राबवण्यावर भर दिला*
*यावेळी *महायुतीच्या माध्यमातून आम्ही सर्व मिळून स्थानिक स्वराज्य संस्थां मध्ये विजयाचा झेंडा फडकवणार आहोत असा विश्वास दिला. तसेच आमदार सुमीतदादा वानखेडे यांच्या नेतृत्वात ही महायुती बळकट होत आहे असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते दिलीप पोटफोडे व शिवसेनेचे नेते निलेश देशमुख यांनी व्यक्त केला*
*चर्चा अतिशय सकारात्मक रित्या पार पडली यावर योग्य तो मार्ग काढण्याचा शब्द आमदार सुमितदादा वानखेडे यांनी दिला, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 जागेच्या मागणीचा प्रस्तावाचा अहवाल मा. आमदार सुमितदादा वानखेडे यांना दिला* *त्याची प्रतिलिपी प्रदेशाध्यक्ष सुनिलजी तटकरे व जिल्हाध्यक्ष शरदजी शहारे यांना पाठविण्यात आल्या*

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या