spot_img

*क्रियाशील तरुणांना स्वतःचा व्यवसाय स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी “ग्लोबल वर्कफोर्स” नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार*

तळेगाव (शा.पंत): १५ ऑक्टोबर ला भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपा अल्पसंख्यांक व युवा मोर्चाच्या वतीने डबा पार्टी, चर्चासत्र व जंगल सफारी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले होते.

चर्चासत्रात पाच विषयावर चर्चा झाली राष्ट्रभाव व राष्ट्रभक्तीचा नवा दृष्टिकोन, आत्मनिर्भर भारत – स्थानिक संधी, जागतिक दृष्टी, ग्रामीण युवकांसाठी रोजगार व व्यवसायाचे नवे मार्ग,GST व Tariff – नव्या उद्योजकांसाठी समज आणि दिशा,डॉ. कलाम यांचे विचार – विचार करा, स्वप्न पहा, कृती करा व वेळेवरील विषयावर सुद्धा चर्चा झाली. सर्व चर्चारूपी समुद्र मंथनातून एक अमृत कलश बाहेर आला तो म्हणजे (ग्लोबल वर्कफोर्स) ‘कार्यबल विचार’ प्रत्येक गावागावात १०-२० उत्साही युवकांना एकत्र आणून बेरोजगारी व बेकारीतील फरक समजून सांगायचा, कोणतेही काम लहान मोठे नसते, व्यवसायातील युवकांच्या मनामधील नफा तोटाची भीती, कोणतेही काम करण्याची शरम, मिळेल ते काम करायला प्रोत्साहन देण्याबाबत उपक्रम आष्टी तालुक्यात राबविण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.

*स्वतःचा विकास म्हणजे देशाचा विकास*

आपल्या देशाला जगात चौथ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी GDP वाढवावा लागतो आणि GDP मोजण्याचे मुख्य १० निर्देशांका पैकी प्रमुख २ आपल्या हातात आहे, १) प्रतिव्यक्ती उत्पन्न वाढविणे २) बेरोजगारी दर कमी करणे, म्हणजेच देशात कोणतेही काम करणारा व्यक्ती हा अप्रत्यक्ष पणे देशाच्या विकासासाठी काम करतो आणि काम नकरणारे गावागावात बेकारी पसरवणारे व्यक्ती देशाच्या विकासात अडथळा निर्माण करतो म्हणून काम करणे गरजेचे आहे, गावागावात “ग्लोबल वर्कफोर्स” कार्यबल तरुणांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

*ग्लोबल वर्कफोर्स नवीन नसून भारताचे गतवैभव*

भारत “ग्रामप्रधान देश” आहे, संपूर्ण देशाचे आर्थिक आणि सामाजिक आयुष्य गावांवर आधारित आहे गाव म्हणजे एक छोटं राष्ट्र व स्वतःची स्वावलंबी अर्थव्यवस्था होती जिथे सर्व गोष्टी गावातच मिळत होत्या आणि गावातील पैसा वस्तुविनिमय (Barter system) पध्दतीने गावातच फिरत होता कारण गाव जिवन उपयोगी उत्पादन स्वतःच करत असल्याने बाहेरील वस्तूंवर अवलंबून राहत नव्हते प्रत्येक गावात शेतकरी व जातीय व्यवसाय होते, परंतु परस्परावलंबी निसर्गचक्र विस्कळीत झाले ते बाहेरील आक्रमण व ब्रिटिशांची सत्ता आल्याने म्हणून गावाचे हरवलेले वैभव परत मिळण्यासाठी प्रत्येक युवकाने “मी स्वतःसाठी,गावासाठी व देशासाठी काय करू शकतो हा प्रश्न स्वतःला विचारणे काळाची गरज आहे.
डबा पार्टी, चर्चासत्र व जंगल सफारी कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कमलाकर निंभोरकर माजी तालुका अध्यक्ष भाजपा ,जिल्हा भाजपा महामंत्री, अशोक विजयकर जिल्हाध्यक्ष भाजपा अनु.जाती मोर्चा, नवाज पठाण जिल्हाध्यक्ष भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा, सचिन होले अध्यक्ष भाजपा आष्टी तालुका , अनिरुद्ध दंडाळे तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा व सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

*आदिवासी गावाला तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळामुळे मिळणार रोजगार*

तळेगाव ते आष्टी मार्गाच्या मध्यभागी असलेले सिरकुटणी गाव आदिवासी बहुल आहे गावात आसरा माता देवस्थान असल्याने तेथे रोज भाविक येतात देवस्थान मागील जंगलातील तलावाच्या पाठीमागील सपाट नैसर्गिक लॉनवर व निसर्गरम्य ठिकाणी कार्यक्रम घेतल्याने हे निसर्गरम्य स्थळ सगळ्याच्या दृष्टीत आले, देवस्थान व तलाव परिसर विकसित करून तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ झाल्यास येणाऱ्या पर्यटक व भाविकांमुळे आदिवासी बहुल गावाला रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या