आष्टी (शहीद): स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आष्टी तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक शिवानी मंगल कार्यालय आष्टी येथे संपन्न झाली . ही आढावा बैठक वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदुरकर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी व्यासपीठावर आर्वी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे प्रभारी अनिल गायकवाड तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा “शिदोरी मासिक ” चे प्रबंध संपादक अनंत बाबूजीदादा मोहोड , शैलेश अग्रवाल ,वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जोरे ,आष्टी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश लांडे, आष्टी शहर अध्यक्ष सौदानसिंग उपस्थित होते याप्रसंगी आर्वी विधानसभेचे प्रभारी अनिल गायकवाड यांनी पक्ष मजबूत करण्याकरीता व संघटन वाढविण्याकरीता एकजुटीने काम करण्याची गरज आहे, आपआपसातील भेदभाव विसरून कामाला लागण्याची आता खरी वेळ आली आहे. अशी सूचना केली. काँग्रेसचे महासचिव अनंत दादा मोहोड यांनी असंख्य काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व पक्षाचे कार्य एकजुटीने करावे त्याकरीता माझे जे काही सहकार्य लागेल त्यासाठी मी तत्पर आहे .असे सांगितले जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ चांदुरकर यांनी नवनियुक्त तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या. व होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरिता सर्वांनी सज्ज राहुन
काँग्रेसला मदत करावी.असे आवाहन केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष श्री.चंद्रशेखर जोरे यांनी केले .त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली व प्रत्येक गावातील बुथ कमिट्या बीएलए नियुक्ती, पदवीधर मतदारसंघाचे नोंदणी फॉर्म भरण्याबाबत बाबत माहिती दिली . कार्यक्रमाचे संचालन आष्टी तालुका काँग्रेस सचिव रविंद्र कोहळे.
यांनी केले.
*काँग्रेस कार्यकर्त्यामद्धे प्रचंड उत्साहाचे वातावरण*
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव श्री. अनंतभाऊ मोहोड यांनी प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेसला अनंत दादा मोहोड सारखे नेतृत्व मिळाल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसून झाले. अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तसेच अनंतभाऊ मोहोड यांनी नव्या जोमाने व ताकतीने सर्व निवडणुका लढण्याचा निर्धार व्यक्त केला.