तात्काळ श्री.अमरभाऊ काळे घोराडोंगरी, मध्यप्रदेश येथे दौरा करतील.
घोराडोंगरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवार करिता प्रचार,पक्ष संघटन मजबूत करण्याचे व आढावा घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली असून संपुर्ण आढावा संदर्भात राज्य प्रभारी,प्रदेशाध्यक्ष व निरीक्षकांसोबत चर्चा करण्यात येईल.
सध्या राज्यात काँग्रेस पक्षाची स्थिती मजबूत आहे,काँग्रेस अध्यक्ष श्री.मल्लिकार्जुन खरगे जी,खा.राहुलजी गांधी यांच्यासह इतर नेत्यांच्या जाहीर सभा,रोड शो मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येत आहे.माजी मुख्यमंत्री श्री.कमलनाथ यांच्या नेतृत्वात पक्षाने आपला जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध केला आहे.
मध्यप्रदेश येथे दि.१७ नोव्हेंबर रोजी २३० विधानसभा क्षेत्रांकरिता मतदान होणार असून दि.३ डिसेंबर ला निकाल जाहिर करण्यात येणार आहे.