spot_img

रुग्णालयाविषयी कुठलीही शंका न बाळगता लोकार्पण करण्याची जबाबदारी माझी- सुमित वानखेडे

(कार्यकारी संपादक अवधूत शेंद्रे- दै.शहीद भूमी प्रहार)

वर्धा – आष्टी(श):- राज्य शासनाचे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णालय उभारण्याचे धोरण असून त्यात वर्धा जिल्ह्याच्या वाट्यावर येत असलेले ३०० खाटाचे रुग्णालय तळेगाव (श्या.पंत) येथे राज्य शासनाने मंजूर करून एक सुखद धक्का दिला असून या विषयी नागरिकांनी कुठली शंका न बाळगता लोकार्पण होईपर्यंत माझी जबाबदारी असल्याचे मत तळेगाव येथे नागरी सत्कारा दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांनी नागरी सत्कारा दरम्यान व्यक्त केले

यावेळी मंचावर भाजपाचे पदाधिकारी सचिन होले,अशोक विजयकर,कमलाकर निंभोरकर, गुणवंतराव नरांगे,डॉ.नारायण खेरडे,दत्ता पुसदेकर,शरीफ पठाण,अजय लोखंडे,चद्रशेखर बाबरे,विशाल गाडगे,सुरेश नागपुरे,राजेश ठाकरे,राहुल बुले,नवाज पठाण आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते पुढे बोलताना सुमित वानखेडे म्हणाले की,२०१९ नंतर मतदारांनी बहुमताने भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिले मात्र तत्कालीन शिवसेनेने भाजपा पक्षा सोबत गद्दारी करून महाविकास आघाडी स्थापित केली आणि अडीच वर्षे आघाडी सरकार सत्तेत असताना कोरोना काळात नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला समोर जावे लागले गरीब माणूस खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार करू शकत नाही

त्याची होणारी ससेहोलपट लक्षात घेता राज्य शासनाने १४जिल्ह्यात शासकीय रुग्णालय स्थापित करण्याचा निर्णय घेतला त्यात वर्धा जिल्ह्याच्या वाटेवर येणारे शासकीय रुग्णालय तळेगाव येथे होण्यासाठी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खा.रामदास तडस,आ.दादाराव केचे अभिनंदनास पात्र आहे अवघ्या ४ दिवसा अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फाईलवर सही केली

आणि इतक्या लवकर रुग्णालयाचा आदेश काढण्यात येईल असे ध्यानी मनी नसताना शासनाने धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला आदेश काढून नागरिकांना सुखद धक्का दिला गोरगरीब रुग्णासाठी सी.टी.स्कॅन,एक्स-रे ,एम.आर.ए,औषधी यासारख्या मोफत सेवा शासकीय रुग्णालयातून पुरवल्या जातात त्याचा थेट फायदा गरजूंना होईल अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या रुग्णालयास विरोध केला होता

पण त्यांच्याकडे लक्ष न देता ३०० खाटाचे रुग्णालय मंजूर करण्यात यश आले याविषयी नागरिकांनी कुठलीही शंका कुशंका न वाढता इमारतीचे लोकार्पण होईपर्यंत माझी जबाबदारी आहे अशी स्पष्टोक्ती सुमितदादा वानखेडे यांनी यावेळी दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक विजयकर यांनी केले तर रुग्णालयाविषयी सचिन होले यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार देवानंद डोळस यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्त्याची उपस्थिती होती

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या