spot_img

माजी आमदार अमर काळे यांचे हस्ते पवन वांगेकर यांचा सत्कार

तळेगाव (शा.पंत)वार्ताहर :येथील भवानी कृषी एजन्सी चे संचालक विनोद वांगेकर यांचे सुपुत्र पवन वांगेकर यांची भारत सरकार उपकृत न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड डिपार्टमेंट ऑफ एनर्जी येथे वैज्ञानिक अधिकारी म्हणून चेन्नई येथे नुकतीच निवड झाली .

या निवडीबद्दल आर्वी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटी मुंबईचे महासचिव अमर काळे यांनी विनोद वांगेकर यांच्या तळेगाव,(शा.पंत )येथील निवासस्थानी जाऊन वैज्ञानिक अधिकारी पवन वांगेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून सन्मानित केले. या प्रसंगी पवन वांगेकर यांना पुढील भविष्याच्या वाटचाली करिता शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या .याप्रसंगी ते म्हणाले.

की पवनने जिद्द,चिकाटी ध्येय बाळगुण ग्रामीण भागातील मुले सुद्धा उच्च पदावर जाऊन यशस्वी असे शिखर गाठू शकते.असे दाखऊन दिले. या प्रसंगी काँग्रेस चे चंद्रशेखर जोरे, मधुसूदन नागपुरे , प्रमोद चोहटकर, प्रमोद भोजने ,राजेश करोले, विनोद खोपे, फतेहसिंह जुने आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या