भारसवाडा येथील वास्तव लक्ष्मी मंडळ येथे आज दिनांक १८ ला महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्यामुळे बीआर एस नेते जयदादा बेलखडे यांनी सदिच्छा भेट देऊन त्यांचे हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी भाऊबीज निमित्याने येथील उपस्थित सर्व महिला मंडळी यांना साडी भेट देण्यात आली .
तसेच त्यांचा मंडळाचे वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .त्यावेळी त्यांनी मत व्यक्त केले की मी राजकारणी व्यक्ती नाही .मला शेतकऱ्यां करिता व रोजगार निर्माण व्हावा हा उद्देश ठेऊन काम करायचे आहे.उपस्थित सर्व माझ्या सर्व बहिणींनी भावाकडून एक छोटीशी भाऊबीज ची भेट म्हणून साडीचा स्वीकार करावा.यावेळी दिपकराव उबाळे , सुनील चौधरी,श्रीधर खोपे, व मंडळाचे सदस्य राहुल उबाळे,विशाल उभाड, सम्यक उबाळे, कृनाल तरप टे ,शिवम खं डार, आदर्श लांडे,वंश खंडार,यश लोखंडे व वास्तव लक्ष्मी मंडळा चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते