spot_img

महाराजाच्या कृपेने देशातील सर्वात मोठे हार्ट हॉस्पिटल बनवण्यासाठी प्रयत्न

सुधीर दिवे दै.शहीद भूमी प्रहार कार्य.संपादक आष्टी अवधूत शेंद्रे वर्धा – आष्टी

(श):- संत अच्युत महाराज यांच्या दूरदृष्टीतून गरिबांसाठी निर्माण झालेलं संत अच्युत महाराज हॉस्पिटल येत्या दोन वर्षात गरिबांसाठी देशातील सर्वाधिक मोठ हार्ट हॉस्पिटल असेल असे संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक सुधीर दिवे यांनी दैनिक शहीद भूमी प्रहार चे कार्यकारी संपादक अवधूत शेंद्रे यांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की यात पुढे बोलताना माननीय दिवे म्हणाले की,१९९५ ते २०१२ पर्यंत हृदयावर शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था आपल्या विभागात उपलब्ध नसल्यामुळे हृदयरुग्णाला मुंबईत केईएम रुग्णालयात न्यावे लागत असे त्यावेळी पहिल्या ५ शस्त्रक्रिया करण्यासाठी ५ दानदाते शोधून प्रत्येकी ५१ हजाराचे दान गोळा करून मुंबई येथील केईएम रुग्णालयात भरती केल्या जाई

आणि तेथे डॉ.रत्ना मोबतकर या शस्त्रक्रिया करायच्या असे २००७ पर्यंत एकूण १ हजार २०० रुग्णाला बरे करण्यात यश आले यात रुग्णाला मुंबईला ३ वेळा नेण्यासाठी कसरत करावी लागेल शिवाय प्रचंड आर्थिक कसरत असायची त्यासाठी संत अच्युत महाराजाच्या कल्पनेत गरिबांसाठी हृदयविकारावर उपचार करणारे रुग्णालय असावे अशी कल्पना सत्यात उतरवण्यासाठी महाराजांनी प्रत्येकी एका कुटुंबापासून दहा रुपये अल्पशी वर्गणी गोळा केली आणि त्यात कुणी २० रुपये दिले तर कुटुंबातील दोन व्यक्तीचे नाव वर्गणीदार म्हणून असायची एवढी पारदर्शकता महाराजाच्या समाजकार्यात होती

तर हॉट हॉस्पिटलची कल्पना संत अच्युत महाराजांच्या एका मुस्लिम रिक्षा चालकाच्या मुलीच्या प्रसंगावरून महाराजांना अधिक भिडली त्यामुलीचा प्रसंग विशद करताना माननीय दिवे सरांच्या डोळ्यातही अश्रू अनावर झाले होते त्यावेळी महाराजांचा दर्यापुरातील दैनंदिन रिक्षाचालक मुस्लिम समाजाचा होता त्यांच्या मुलीला हृदयाचा आजार जडला होता

दररोज हसणारा रिक्षा चालक आज मात्र पानावलेल्या डोळ्यांनी महाराजा कडे बघत होता त्याला महाराजांनी कारण विचारले असता त्यांनी माझ्या नजिमा बानो नावाच्या मुलीला हृदयाचा आजार झाला असून त्यासाठी एक लाख रुपयाचा खर्च असल्याचे सांगितले आणि त्यामुळे मी तिला वाचवू शकत नाही असे मुस्लिम रिक्षा चालकाने संत अच्युत महाराजांना सांगितले तेव्हा महाराजाच्या मनावर परिणाम होत अशा असंख्य नजीमा बानो समाजात हृदयविकाराने पीडित आहे

त्यांना मदतीची गरज आहे या हृदय हेलावणाऱ्या घटनेपासून महाराजांनी प्रेरणा घेत अमरावती येथील मार्डी रोड स्थित हार्ट हॉस्पिटल उभे केले संत अच्युत महाराजांनी साने गुरुजी मानव सेवा संघ अमरावती द्वारा ४ एकरात उभे केलेले हार्ट हॉस्पिटलमध्ये सरासरी दैनदिन ते ४ओपन हार्ट सर्जरी,२५ अँजिओग्राफी आणि १० ते १२ एन्जोप्लास्टी केल्या जाते

सध्या २ कॅथलॅब असून पुढे ७ ते ८ महिन्यात आणखीन एक कॅथ लॅब सुरू करणार असून महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना हॉस्पिटलमध्ये राबविल्या जाते त्यासाठी संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमध्ये संत अच्युत महाराजांच्या असीम कृपेने दवा सोबत दुवा ही मिळत असल्याचा पुनर्विचार हार्ट हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक सुधीर दिवे यांनी नागपूर स्थित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयातील दुसऱ्या माळ्यावर दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या