spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या रोजगार व स्वयं रोजगार मेळाव्याला महिला बाल कल्याण मंत्री अदितीताई तटकरे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांची उपस्थिती

आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या रा. कॉ. पा.जनसंपर्क कार्यालयाच उदघाटन,
महिला बालकल्याण मंत्री अदिती ताई तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण
,माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय महासचिव सुबोध मोहिते, रोजगार व स्वयं रोजगार प्रदेशाध्यक्षा, मेघा पवार,प्रदेश उपाध्यक्ष दिवाकर गमे, वर्धा जिल्हाध्यक्ष शरदजी शहारे, उद्योजक अक्कू दास ग्रुप ऑफ इंडस्ट्रि व पुणे च्या नामांकित कंपन्या सह जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी चे दिग्गज उपस्थित राहणार,

आर्वी : येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप शा. पोटफोडे, महिला आघाडी ग्रामीण जिल्हाध्यक्ष अश्विनी शिरपूरकर, रोजगार व स्वयं रोजगार जिल्हाध्यक्ष रेखा वानखडे यांच्या संयुक्त पुढाकारात व सर्व टीम च्या परिश्रमाणे दिनांक 10/12/2023 रोज रविवार ला भव्य रोजगार व स्वयं रोजगार मेळावा तसेच,जनसंपर्क कार्यालय उदघाटन सोहळा आयोजित केला आहे, या साठी सकाळी 10 वाजता आर्वी येथे महिला व बाल कल्याण मंत्री अदितीताई तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण,माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय महासचिव सुबोध मोहिते, रोजगार व स्वयं रोजगार प्रदेशाध्यक्षा, मेघा पवार,प्रदेश उपाध्यक्ष दिवाकर गमे, वर्धा जिल्हाध्यक्ष शरदजी शहारे

इंदिरा चौक येथील जनसंपर्क कार्यालय उदघाटन करणार कार्यकर्ता पदाधिकारी यांच्याशी मंत्री महोदय कार्यालयात संवाद साधतील निवेदन स्वीकारतील व तेथून सहकार मंगल कार्यालय येथे आयोजित मेळाव्यात महिलांना, तरुणांना, तरुणीना, महिला बचत गटांना हाताला काम मिळावं, छोटे उद्योग उभे राहावे व विदर्भातील उद्योगातून निर्मित होणाऱ्या मालाला मुंबई पुणे येथे मार्केट उपलब्ध व्हाव व या सर्व प्रक्रियेत महिलांना, बचत गटांना उद्योग उभारणी साठी महिला व बाल कल्यान विभागाकडून, व रोजगार स्वयं रोजगार विभागाकडून सर्व स्तरावर पुढाकार घेत सक्षम करण्यासाठी शासकीय प्रशासकीय पातळीवरून होणाऱ्या सहकार्य व योजना तसेच सरकार द्वारा राबविल्या जाणाऱ्या सर्व योजना लोकांन पर्यंत

पोहचवण्यासाठी पुढाकार घेत मार्गदर्शन दर्शन करतील तसेच पुणे मुंबई च्या रोजगार निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या व रोजगार स्वयं रोजगार प्रदेशाध्यक्षमेघा पवार व कंपन्या महिलांना सक्षम कारण्यासाठी मेळाव्यातून मार्गदर्शन व प्रत्यक्ष सुरुवात करण्यासाठी सर्व स्तरावर माहिती उपलब्ध करून देत पुढील नियोजन ठरवणार आहे, या मेळाव्यातून विदर्भात मोठा बदल घडवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा च्या राष्ट्रवादी चा आहे,प्रयत्न आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या