spot_img

लोकांना भगव्या,हिरव्या आणि निळ्या रंगात गुंतवून ठेवने एक षडयंत्र :- आ.बच्चू कडूचा अस्सल मुद्द्याला हात अवधूत शेंद्रे

वर्धा – आष्टी (श):– नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आ. बच्चू कडू यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भारत एकसंघ ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे वाक्य केलेला व्हिडिओ समाज माध्यमात तुफान फिरतो आहे त्यात त्यांनी शेतकऱ्याच्या ज्वलंत समस्या मांडतांना वर्ष २००० मध्ये सोयाबीन ४ हजार ५०० ला विकत होती तर २०२३ मध्ये तब्बल २३ वर्षांनी सुध्दा सोयाबीन ४ हजार ५०० लाच विकत असल्याचे म्हटले आहे पुढे आ.

बच्चू कडू शेतकऱ्याच्या संत्रा पिकाचे उदाहरणे देताना वर्ष २००० मध्ये ३० हजार रुपये प्रतिटन संत्र्याचे भाव होते तर आजही २०२३ मध्ये ३० हजार रुपये प्रतिटन असल्याचे म्हटले आहे तर कापूस १० हजार रुपये क्विंटल वरून ६ हजार रुपयाला आला, चना ४ हजार ५०० क्विंटलचा ४ हजार ७०० रुपयाला,तुर १४ हजार रुपये किमतीची १० हजारावर आहे पेट्रोल ६६ रुपये लिटर रुपयाचे १०७ रुपये लिटर, डिझेल ५६ रुपये लिटरचे ९७ रुपये लिटर, डिएपी खत ४८२ रुपये किमतीचे १३५० रुपये,१०.२६.२६ खत ३६५ रुपयाचे १७०० रुपयाला,१८.१८.१० खत ४१२ रुपये किमतीचे १३०० रुपयाला वाढलेले आहे हा सर्व खर्च प्रचंड वाढला असताना शेतमालाचे भाव मात्र खाली आला आहे.

शुक्र माना तुम्हाला लोक रस्त्यावर फिरू देत कारण तुम्ही आम्ही सगळ्या राजकीय पक्षाने लोकांना जाती धर्मात अडकवून ठेवल त्याला हिरव्या,भगव्या आणि निळ्या रंगात गुंतवून पद्धतशीरपणे त्याची फाळणी केली आहे त्याच्या डोक्यात जात,धर्म एवढा टाकला की त्याच्या डोक्यात शेतकरी असल्याचा भासच होवू देत नाही एवढे हुशार राजकारणी झाले आहेत आणि भिकार चोट योजना स्वस्त धान्य दुकानातून लोकांना न मागताही देत आहे असे निकोप लोकशाहीला पोषक वाक्य अचलपूर विधानसभा क्षेत्राचे आ. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू बोललेत त्यांचा हा नागपूर येथील अधिवेशनातील व्हिडिओ प्रचंड प्रमाणात समाजमाध्यमात व्हायरल होतो आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या