*वरुड:दिनांक२२
*मला गायक बनायच नव्हतं,स्वामी समर्थामुळे मी गायक झालो असे
प्रतिपादन महाराष्ट्राचे सुप्रसिध्द
गायक श्री अजित कडकडे यांनी जाहिर प्रतिपादन केले ते संत अच्युत महाराज जन्मशताब्दी निमित्त आयोजित भजन संध्या कार्यक्रमात हजारो श्रॊत्यासमोर दिलखुलासपणे बोलत होते
स्वामी समर्थामुळेच माझा आत्मविश्वास वाढला असुन ते सदॆव माझ्या पाठीशी असतात असे हि ते म्हणाले
गॊळण म्हणजे प्रभु श्रीक्रुष्णाचे भक्तिरंग आहे
त्यांच्या भजनसंध्यामध्ये गायक अजित कडकडे यांनी श्रोत्यांच्या आवडीनुसार भजन सादर केले श्रोता खुश तर आम्ही खुश, असतो तेव्हा मन तल्लीन
करुन भजन सादर केले
संत अच्युत महाराज जन्मशताब्दी सभाग्रुहात आगमन झाल्यावर जन्मशताब्दी महोत्सव समितिचे अध्यक्ष श्री सुधीर दिवे,संत अच्युत महाराज जन्मभुमि संस्थानचे प्रमुख दत्ताभाऊ शिंदे,संत एकनाथ देवस्थानचे अध्यक्ष गिरिधर देशमुख,व राजेन्द्र चांडक ,स्वागताध्यक्ष डाॅ मनोहर आंडे,यांनी व विश्वस्तांनी, तसेच बजरंग दल च्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले
भजनसंध्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक श्री अजित कडकडे यांनी “”आज अवघे गरजे पंढरपुर. ,असा कसा असा कसा,देव एका पायाने लंगडा,वाळवंटी जातो किर्तन करतो,तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हि या झोपडीत माझ्या या भजनाचा उल्लेख केला, “घेऊन निघालो दत्ताची पालखी”आणी भक्त एकच असल्याचा अनुभव यावा अशी आराधना हवी
प्रत्येकाचे हदयात आत्मा राम आहे तेव्हा आपले बोलणे नम्रतेचे असावे असे उदबोधन भजन करता करता गायक अजित कडकडे म्हणाले
कार्यक्रमाचे संचालन अनंत धर्माळे केले तर महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक यांचे बाबत गायञी परिवारचे अध्यक्ष गिरिधर देशमुख यांनी शब्दसुमन अर्पित केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जन्मभुमि संस्थानचे अध्यक्ष श्री दत्ताभाऊ शिंदे यांनी केले कार्यक्रमाला हजारोंचा जनसमुदाय उसळला होता. या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पारपाडण्या करिता जन्मशताब्दी उत्सवा समितीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्याचे सहकार्य लाभले…