spot_img

श्रीरामाच्या गजराने दुमदुमली अंतोरा नगरी. आष्टी शहीद

प्रतिनिधी . अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त अंतोरा येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन व श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा सेवा समिती अंतोरा यांच्या वतीने करण्यात आले होते. यामधे दिनांक २२/०१/२०२४ ला सकाळी जुना अंतोरा, गाडगेनगर, मनिकनगर, नवीन अंतोरा या गावामधून भव्य श्रीरामाची मिरवणूक काढण्यात आली. यामधे सर्व गावातील भजणी मंडळाचा समावेश होता. नंतर मुंगसे लेआऊट येथील भव्य मंडपात ह. भ. प श्री मनोज महाराज सतांगे. आळंदीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच यानंतर आयोधेतील कारसेवक श्री कमलाकरजी निंभोरकर, व श्री नरेंद्र भनेरकर यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच प्रमुख पाहुणे श्री सुभाषजी लोहे.श्री सचिनजी होले , श्री देवानंदजी डोळस श्री मनोज महाराज सातंगे यांचा शाल व श्रफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.
नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसाद नंतर रात्री ७ वाजता सामूहिक हनुमान चालीसा पठण व महा आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.गावातील लोकांनी घरोघरी ५ दिवे लावून दिवाळी साजरी केली. यामधे संपूर्ण ग्रामवासी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन अंतोरा, व श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा सेवा समिती अंतोरा याच्या वतीने करण्यात आले होते. तसेच कमी वेळात सर्व गावकऱ्यांनी तन मन धनाने सहकार्य केल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे राजेश ठाकरे यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या