spot_img

*पी आर पाटील पॉलिटेक्निक येथे खुला रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन* .

तळेगाव शामजी पंत-
मराठा शिक्षण संस्थाद्वारा संचालित पी. आर. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक अँड टेक्नॉलॉजी, तळेगाव (शा.पं)येथे खुला रोजगार मेळावा दिनांक 23 जाने.2024ला सकाळी 10 वाजता पी.आर. पाटील शैक्षणिक संकुल, तळेगाव शामजी(पंत),तालुका आष्टी, जिल्हा वर्धा येथे आयोजित करण्यात आला. या मेळाव्यामध्ये पॉलिटेक्निकच्या जवळपास 350 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.या मेळाव्यामध्ये बजाज ऑटो लिमिटेड,पुणे या नामांकित कंपनीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली.या मेळाव्याचे आयोजन पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांना रोजगार संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने करण्यात आले होते.ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी रोजगार मेळाव्याला भरपूर प्रतिसाद दिला व मेळावा यशस्वीरित्या पार पडला.महविध्यालयामधे या प्रकारचे रोजगार मेळावे सतत आयोजित केले जातात.अश्या आयोजणांमुळे पॉलीटेकनिक च्या शेकडो विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. उत्कृष्ठ शिक्षण,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व रोजगार प्राप्ती यामुळे पी.आर.पाटील पॉलीटेकनिक कडे विद्यार्थि व पालकांचा ओढा वाढतच आहे.महविद्यालयामधे सिव्हिल,कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल व मेकेनिकेल इंजीनिअरिंग या शाखा आहेत. संस्थेच्या या उपक्रमाबद्दल संस्थेवर प्रेम करणाऱ्या पालकांनी समाधान व्यक्त केले. सदर मेळाव्याच्या यशस्वी आयोजन करीता मराठा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.दिलीप भाऊ निंभोरकर,प्राचार्य श्री अतुल ठाकरे,कंपनीचे अधिकारी श्री.अतिशसिंग ठाकूर,महाविद्यालयाचे प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी प्रा. तुषार खोडके,समन्वयक प्रा.करण शहा,प्रा.रोशन नासरे,प्रा.अमित घोरमाडे तसेच संस्थेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या