spot_img

*भारताच्या उज्वल भविष्यासाठी आद्यकर्तव्य म्हणून प्रत्येक मतदाराने मतदानाचा अधिकार बजावावा – आ. डॉ. रामदास आंबटकर*

गजेंद्र डोंगरे वर्धा :-* इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर येथे राष्ट्रीय मतदार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धा चंद्रपूर गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे विधान परिषद सदस्य आमदार डॉ. रामदास आंबटकर होते. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. आंबटकर यांनी भारताच्या उज्वल भविष्यासाठी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा अधिकार आद्य कर्तव्य म्हणून बजावने आवश्यक आहे. प्रत्येकाने विचारपूर्वक व राष्ट्रहित लक्षात घेऊन सरकार निवडायला हवे. अठरा वर्षे पूर्ण होत असलेल्या युवकांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवून मतदान प्रक्रियेत सक्रिय भाग घेण्याचे आवाहन सुद्धा यावेळी डॉ. आंबटकर यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला योगेश मानव विकास प्रतिष्ठान हिंगणघाटचे संस्थापक अध्यक्ष वामनराव खोडे, अल्लीपूरचे सरपंच श्री नितीन चंदनखेडे, संस्थेचे सचिव योगेश खोडे, प्राचार्य अर्चना मुडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी आमदार आंबटकर यांचे हस्ते बीएलओ श्री प्रभाकर घाटुर्ले व श्री कांचनकुमार लोणारे, यांच्यासोबतच शाळेतून नोंदणी केलेल्या नव मतदारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित नवमतदारांशी आमदार आंबटकर यांनी हितगुज साधले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या अर्चना मुडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. चंद्रशेखर रेवतकर तर आभार प्रदर्शन प्रा. अविनाश खोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक विलास बेले शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या