spot_img

*प्रजासत्ताक दिनी झाला समाजसेवा व देशसेवेचा संगम…*

◆ *ईवान तर्फे प्रजासत्ताकदिनी कर्मयोगी फाऊंडेशन सन्मानित*
दिनांक २६ जानेवारी २०२४ शुक्रवारला अमर जवान स्मारक अजनी, नागपूर येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. वायुसैनिक संघटना ( ईवान )नागपूर व अमर जवान स्मारक समिती नागपूर यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात बुटीबोरी येथील कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे व पदाधिकारी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कर्मयोगी फाऊंडेशन खाजगीत काम करणाऱ्या कामगारांची सेवाभावी संघटना असून ती कर्मयोगी गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा वारसा जपत समर्पित भावनेने गावखेड्यातील वंचित, शोषित,गोरगरिबांना आधार देत, ग्रामविकासावर मोठया प्रमाणात निरंतर कार्य करीत त्यांनी आपले कार्य आतापर्यंत २०७ गावात नेऊन पोहोचविले आहे. त्यांच्या ह्या समाजकार्याची दखल घेत ईवान च्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. या निमित्ताने देशसेवा व समाजसेवेचा संगम झाल्याची भावना उपस्थित मंडळीनी व्यक्त केली.
कार्यक्रमात अध्यक्ष स्थान विंग कमांडर वोहरा ह्यांनी भूषविले. कार्यक्रमात प्रामुख्याने ब्रिगे.सुनील गावपांडे, ग्रूप कॅप्टन रणबीर सिंग,ग्रूप कॅप्टन हरिदास,विंग कमांडर लिमये, . इंगळे साहेब, स्वामीधाम बेसाचे अध्यक्ष दिनकरजी कडू ईवानचे संस्थापक अध्यक्ष मनोहर भातकुलकर ह्यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. ईवानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत नांदरुणकर समवेत ईवानचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने तिन्ही सेनेचे माजी सैनिक, परीवार, व विविध संघटनेचे पदाधिकारी, महीला, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन ईवानचे सचिव श्री. अजय गाढवे ह्यांनी केले व अविनाश वानखेडे नी कर्मयोगी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा परीचय करून दिला. नंतर टीम स्वरमेवा द्वारा देशभक्तिपर गीते सादर करून संपूर्ण अजनी परीसर देशभक्तिच्या भावनेने ओतप्रोत केला. आभार प्रदर्शन नरेन्द्र शहाणे ह्यानी केले.
समस्त भारतीयांना प्रजासत्ताक दिवसाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या