आष्टी( शहीद) प्रतिनिधी : कृषी क्षेत्रात अग्रगण्य धर्मज क्रॉप गार्ड लिमिटेड ही शेती विषयक किटकनाशक निर्मिती आणि विक्री करणारी कंपनी आहे.ही कंपनी दरवर्षी संपूर्ण भारतभर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे २६ जानेवरी प्रजासत्ताक दिनाचे निमित्याने दरवर्षी धर्मज फाउंडेशन मार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय आवश्यक साहित्य बक्षीस रुपात वितरित करतात. या निमित्याने वर्धा जिल्हातील रोहना या गावात प्राथमिक शाळा क्रमांक २ रोहना येथे दिनांक २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी शालेय साहित्य वितरित करण्यात आले. .याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कु. सविताताई वरखडे, राजेंद्र पावडे समाजसेवक रोहना ,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष फनिद्र रघाटाटे,आई भवानी ऍग्रो एजन्सीजचे संचालक उज्वल कडू , कंपनीचे प्रतिनिधी दीपक शेळके टेरीटरि मॅनेजर नागपूर,प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गणेश मुके यांचे हस्ते विद्यार्थांना शालेय साहित्य देण्यात आले. कंपनीच्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्धल शाळेचे वतीने धर्मज फाऊंडेशन चे आभार मानले.