spot_img

*’श्री क्षेत्र वरुड” येथे संत श्रेष्ठ गुरुमाऊली वं अच्युत महाराजांचा जन्मशताब्दी महोत्सव “न भुतो न भविष्यती” असाच* खासदार श्री. रामदास तडस, राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे व आमदार देवेन्द्र भुयार यांनी केली २५ ,२५,२५ लाख रुपये उपासना,व योगभवनासाठी देण्याची घोषणा *२५ हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ*

*वरुड दि २९ – *’श्री क्षेत्र वरुड” येथे संत श्रेष्ठ गुरुमाऊली वं अच्युत महाराजांचा जन्मशताब्दी महोत्सव “न भुतो न भविष्यती” असा
संपन्न झाला 20 तारखेपासुन ते 28 पर्यंत संपन्न झालेल्या महोत्सवात संत”श्री सचिन देव महाराजांचे” अमृततुल्य वाणीतुन श्रीमद भागवत प्रवचने पार पडलीत दररोज सकाळी सामुदायिक प्रार्थना, नवनवीन कार्यक्रमांची मेजवानी भक्तांना प्राप्त झालीमहाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक श्री अजित कडकडे, हभप श्री पुरुषोत्तम महाराज पाटील,,हभप कु शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाला अलोट गर्दी होती 26 जानेवारीला लहान मुलांचा “मेरे वतन” सुंदर देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला दि 27 तारखेला हजारो भाविकांनी८ दिवस१०८ कुन्डी, गायञी महा यज्ञाच्या पुर्णाहुतीचा लाभ घेतला दुपारी
सिद्ध साध्वी व संतांच्या उपस्थितीत संत संमेलन झाले या संत संमेलनात “आचार्य सद्गुरु जितेंद्रनाथ महाराज” व जगद्गुरु श्री रामराजेश्वर माऊली सरकार तसेच सद्गुरुदास महाराजांच्या उपस्थितीत “श्री सचिन देव महाराजांना” सदगुरु जितेंद्रनाथ महाराजांनी “संत” उपाधी प्रदान केली सर्व भक्तांचे डोळे आनंदाने भरून आले त्यानंतर सौ वर्षाताई मुलमुले यांचे सुश्राव्य असे कीर्तन महाराजांच्या जीवन चरित्रावर झाले रात्री ‘श्री शिवा बावस्कर” यांचे विनोदी कीर्तन झाले दि 28 तारखेला भव्यदिव्य अशी वरुडातून ग्राम प्रदक्षिणा निघाली ढोल पथक ,बँड , लेझीम अनेक दिंड्या , पालख्या आणि हजारो भक्त यामध्ये सामील होऊन आनंद घेत होते हभप श्री पवार महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले समारोपीय कार्यक्रमात खासदार श्री रामदास तडस , डॉ अनिल बोंडे , आमदार देवेंद्र भुयार डॉ अनिल सावरकर,डॉ. मनोहर आंडे, मनोज वाडेकर संत सखु माता ,श्री मनोज त्यागी महाराज आदि मंडळी उपस्थित होते सर्व मान्यवरांची भाषणे झालीत समारोपीय प्रवचन श्री संत सचिन देव महाराजांचे झाले,,पतंजलि योग समिती, गायञी परिवार,बजरंग दलाच्या स्वयंसेवकांचे स्वागत आयोजन समितीने केले काला वाटप व 25,000 भक्तांनी महाप्रसाद घेतला प्रस्तुत कार्यक्रमाचे आठ दिवस सुत्रसंचालन पतंजली व गायत्री परीवाराचे अध्यक्ष श्री गिरीधर देशमुख यांनी केले तर संपुर्ण कार्यक्रम जन्मशताब्दी महोत्सव समिती चेअध्यक्ष श्री सुधीर दिवे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला श्री संत अच्युत महाराज जन्मभुमी संस्थान चे अध्यक्ष श्री दत्ताजी शिंदे यांच्या अथक परीश्रमाने, विश्वस्त, गावकरी कार्यकर्त्यांच्या मदतीने कार्यक्रम अप्रतिम पार पडला सर्व कार्यक्रमासाठी आमदार देवेन्द्र भुयार, डॉ मनोहर आंडे, यांचे योगदान महत्वाचे होते ,अतुलनीय व अनुकरणीय अशा या विराट आध्यात्मिक सोहळ्यासाठी राज्यातील व मध्यप्रदेशातील संत अच्युत महाराज सत्संग मंडळाचे योगदान मोलाचे ठरले, यावेळी विश्वस्त मंडळ, संत अच्युत महाराज सत्संग मंडळाने,खासदार रामदास तडस,खासदार डॉ अनिल बोंडे ,आमदार देवेन्द्र भुयार,आयोजक सुधीर दिवे,संयोजक दत्ताभाऊ शिंदे,गिरिधरभाऊ देशमुख, विश्वात यांचा भव्यदिव्य कार्यक्रम शांततेत पार पाडल्याबद्दल,त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला
जन्मोत्सवानिमित्त १५० शिशु व मातांचा सत्कार करण्यात आला समारोपीय कार्यक्रमात खासदार रामदास तडस,खासदार डॉ अनिल बोंडे,आमदार देवेन्द्र भुयार यांनी उपासना केन्द्र,योगभवनासाठी,समाजभवनासाठी २५-२५-२५ लाख देण्याची घोषणा केली यावेळी अच्युतामृत स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले अच्युतामृत स्मरनिकीच्या प्रकाशना करीता श्री अजय देशपांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर आठ दिवस दररोज पहाटे पतंजलि योग शिबिराचे आयोजन,व दररोज १०८ कुन्डी गायञी महायज्ञाचे आयोजन व त्यात हजारो भाविकांचा सहभाग महत्वाचा ठरला ,संत अच्युत महाराज साहित्य संमेलन,गाजले,ग्राम्रगीता पारायण, १०० कोटी ॐ अच्युतायन नम :नामजप पूर्ण करण्यात आला तसेच अच्युत महाराज परिवारातील सर्व सत्संग मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार. करण्यात आला अखेर २५ हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन समाधान व्यक्त केले

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या