तळेगाव(शा. पंत) :
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव( शा.पंत )प्रशासकीय इमारतीचा “ई लोकार्पण सोहळा” दिनांक ३०/१/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता नुकताच पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आमदार दादाराव केचे आर्वी विधानसभा क्षेत्र होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कमलाकर निंभोरकर अध्यक्ष आष्टी तालुका भाजपा, सरपंच सौ. छबुताई खंडार, उपसरपंच त्रिशूल भुयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रामेश्वर पराडकर, तालुका आरोग्य अधिकारी सौ. कसारे, सचिन होले सचिव वर्धा भारतीय जनता पार्टी, अशोक विजयकर, बाबूजी लढ्ढा माजी सदस्य जिल्हा परिषद, सौ. अंकिताताई होले माजी सदस्य जिल्हा परिषद, हेमलताताई भगत माजी उपसभापती पंचायत समिती , देवानंद डोळस माजी सदस्य पंचायत समिती,रुपेश बोबडे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी माननीय नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी “ई लोकार्पण सोहळा”प्रसंगी उद्घाटपर भाषणातून म्हणाले . गरजू व गरीब रुग्णांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना,
आयुष्यमान आरोग्यदायी योजना, मोफत राशन धान्य वितरण योजना अशा अनेक लोकाभिमुख योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन केले. तसेच जिल्ह्यातील विकासासाठी सदैव कटिबद्ध राहू अशी याप्रसंगी ग्वाहीदिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलाकर निंभोरकर, संचालन निलेश बंगाले व आभार प्रदर्शन सौ.अंकिताताई होले यांनी केले.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी त्रिशूल भुयार, देवानंद डोळस, गुणवंतराव नरंगे, राहुल बुले, शरीफ खान पठाण.
आकाश भगत, नवाज खा पठाण, दत्ता पुसदेकर, आदींनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला गावातील तसेच तळेगाव परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.