spot_img

*तळेगाव येथील विद्यार्थिनी राधा काळे हिला नागपूर विद्यापिठातून तृतीय क्रमांक*

तळेगाव शा.(प्रतिनिधी): येथील पी.आर .पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मधील विद्यार्थिनी कुमारी राधा विजयराव काळे तळेगाव (शा.पंत)हिने बॅचलर ऑफ फार्मसी या अभ्यासक्रमामध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधून तृतीय क्रमांक मिळविला. त्याबद्द्ल कुमारी राधा विजय काळे हीचा
ग्रामपंचायत कार्यालय रामदारा( सिरी)येथील सरपंच सौ. जोस्नाताई संजय खरबडे यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपसरपंच विपुल चौधरी, ग्रा.पं. सदस्य मनोज काकडे, ग्रा.पं सदस्य दिलीप पिंगळे, ग्रा.पं. सदस्या सौ विजयाताई ताटे, ग्राम पंचायत सदस्य सौ. शोभाताई धोटे, ग्राम पंचायत सदस्या सौ. सुनीताताई काळे उपस्थित होते.
या नेत्रदीपक यशाबद्दल आई-वडील, शिक्षण संस्थेतील प्राध्यापक वर्ग व रामदरा येथील माजी सरपंच संजय खरबडे, माजी संजय भुजाडे, माजी सरपंच ओंकार धुर्वे, जगन ढोक, नारायण खेरडे, शालिग्राम कुरवाडे आदींनी अभिनंदन केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या