*तळेगाव शा पंत* – प्रा. सारंग ताथोडे पाटील हे गेल्या 16 वर्षापासून शिक्षणक्षेत्रात आहे.त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना संजीवनी फौंडेशन, अहमदनगर या सेवाभावी संस्थेच्या वतीने 2024 या वर्षीचा राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार,संगमनेर जि, अहमदनगर येथे डॉ. सुधीर तांबे मा.पदवीधर आमदार नाशिक विभाग,राहूलभैय्या कोल्हे संचालक,साखर कारखाना संचालक मंडळ महाराष्ट्र राज्य, डॉ. ज्ञानेश्वर सानप संस्थापक अध्यक्ष संजीवनी फौंडेशन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रा.सारंग ताथोडे पाटील हे निवासी शाळेत कार्यरत आहे,त्यांना निवासी राहणाऱ्या मुलांचा खूप जिव्हाळा आहे,मुलांचे शिक्षण, आरोग्य, त्यांच्या कुटुंब विषयक समस्या यामध्ये ते मुलांना सतत मदत करताना दिसतात व यामुळे ते सर्व मुलांचे खूप आवडते शिक्षक आहे.त्यांच्या शाळेतील जास्तीत जास्त मुले मुली त्यांना हक्काने दादा म्हणतात,त्यांचे दादा हे नाव मुलांच्या मनामनात बिंबलेले आहे.
प्रा.सारंग ताथोडे पाटील हे समाजाच्या अनेक क्षेत्रात काम करताना दिसतात समाजातील गरजूंना शक्य त्याप्रकारे मदत करण्यासाठी ते तत्पर असतात,आपल्या परीने होईल ती मदत ते कुणाला पण करतात, त्यामुळे समाजात पण त्यांची एक वेगळी प्रतिमा आहे.
16 वर्षापासून ते कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक म्हणून कार्यरत आहे अद्यापपर्यंत त्यांच्या जवळ जो पण विद्यार्थी शिकला तो आजही त्यांच्या संपर्कात आहे,त्यांच्या भोवती त्यांच्या माजी विद्यार्थी मित्रांचे एक मोठे जाळे आहे,व ते सर्वांचे लाडके दादा आहे.
छत्रपती शिवरायांबद्दलची आस्था त्यांना जन्मतःच आहे,समाज मनात शिवरायांचे विचार रुजविणे,शिवरायांनी समाजाला काय दिले हे समाजाला समजावून सांगण्याचे काम ते करतात. समाज मनात शिवरायांच्या बाबत जो चुकीचा इतिहास मांडल्या जातो त्यामुळे समाज मन विचलित होते,तेव्हा समाजाला खरे शिवराय समजावेव खरा इतिहास त्यांना कळावा म्हणून ते प्रयत्न करतांना दिसतात.आजच्या तरूण पिढीला शिवराय कळावे व त्यांच्या मनात ते रुजावे शिवराय एक राज्याचे नसून संपूर्ण जगाचे आदर्श कसे आहेत हेच ते लोकांना सांगतात.
आज त्यांच्या या पुरस्काराबाबत त्यांना समाजाच्या अनेक कोपऱ्यातून शुभेच्छा मिळत आहे,त्यांचे मित्र व त्यांचे शाळेतील सहकारी शिक्षक, संस्था पदाधिकारी व त्यांच्या माजी विद्यार्थी वर्गातून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
ते आपल्या या पुरस्काराचे श्रेय आपल्या या सर्व लोकांना देतात ते मानतात की ते आज जे काही आहे ते या सर्व लोकांमुळेच……