spot_img

*भारत सेमीकंडर उत्‍पादनाचे केंद्र बनेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी*

वर्धा, 13 मार्च, 2024: भारताचे सेमीकंडक्टर मिशन आणि भारतातील सेमीकंडक्टर सुविधांना बळकटी देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, 13 मार्च रोजी गुजरातमधील धोलेरा व साणंद आणि आसाममधील मोरीगाव येथे तीन मोठ्या प्रकल्पांचा शिलान्‍यास केला. यावेळी ते म्हणाले की भारत सेमीकंडक्टर उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनेल. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयातील कस्तूरबा, गालिब व सप्रे सभागृहात करण्यात आले. यावेळी विश्‍वविद्यालयातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, शोधार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान म्हणाले की, या अभूतपूर्व प्रसंगी देशातील 60 हजारांहून अधिक महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थाही आमच्याशी जोडल्या गेल्या आहेत. हा स्वतःच एक विक्रम आहे. आजचा कार्यक्रम हा , सेमीकंडक्टर प्रकल्पाचा शुभारंभ असेल, पण भविष्यातील भारताचे खरे स्टेकहोल्डर्स असतील तर ते माझ्यासमोर बसलेले तरुण, युवक, विद्यार्थी आहेत जे भारताची शक्ती आहेत. भारत प्रगतीसाठी, स्वावलंबनासाठी आणि जागतिक पुरवठा साखळीतील मजबूत उपस्थितीसाठी सर्वांगीण कार्य करत आहे. या प्रयत्नांमुळे युवकांचा आत्मविश्वासही वाढेल आणि जिथे आत्मविश्वासपूर्ण तरुण असतो तिथे तो आपल्या देशाचे नशीब बदलतो. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या काळात भारत अनेक कारणांमुळे मागे राहिला. पण आता भारत इंडस्ट्री 4.0, चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करण्याच्या उद्देशाने आत्मविश्वासाने पुढे जात आहे. आम्हाला एक क्षणही गमावायचा नाही आणि या दिशेने आपण किती वेगाने काम करत आहोत याचेही आजचा कार्यक्रम हे उदाहरण आहे. सेमीकंडक्टर मिशन सुरू करून आम्ही दोन वर्षांपूर्वी या प्रयत्नाची घोषणा केली होती. आज अवघ्या काही महिन्यांत आम्ही 3 प्रकल्पांची पायाभरणी करत आहोत असेही ते म्‍हणाले.
पंतप्रधान म्हणाले की आज भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक देश आहे. काही काळापूर्वी आम्ही राष्ट्रीय क्वांटम मिशन देखील सुरू केले आहे. नवोन्मेषाला चालना देण्यासाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशनचीही स्थापना करण्यात आली आहे. इंडिया एआय मिशनचाही वेगाने विस्तार होणार आहे. याचा अर्थ आपण केवळ तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या मार्गावरच नव्हे तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या मार्गावरही वाटचाल करत आहोत असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या