spot_img

मिर्झापूर मेरी येथील चेतन कोल्हे यांची भारतीय सैन्य दलात बी आर ओ पदी निवड.

आर्वी तालुका प्रतिनिधी

मिर्झापूर ता. आर्वी येथील चेतन पांडुरंगजी कोल्हे याची भारतीय सैन्य दलाच्या बिआरओ( बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ) मध्ये जनरल रिसर्व इंजिनीअरिंग फोर्सo च्या अंतर्गत टेक्निशियन व्हेईकल मेकॅनिक या पदावर निवड झालेली आहे. चेतन कोल्हे यांचे चवथी पर्यंतचे शिक्षण कृषक इंग्लिश स्कूल,आर्वी येथे झाले तसेच पुढील शिक्षण गांधी विद्यालय येथे झाले. त्यांनी आर्वी येथील आयटीआय कॉलेज मधून मेकॅनिकल शाखेतून डिप्लोमा पर्यंत चे शिक्षण पूर्ण केले व सध्या ते बि. टेक मेकॅनिकल च्या तिसर्‍या वर्षाचे शिक्षण घेत आहे. चेतन हे या आधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कनिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत होते. चेतन हे सध्या टेक्निशियन व्हेईकल मेकॅनिक चे पुणे येथे प्रशिक्षण घेत आहे . त्यांच्या या यशाबद्दल वर्धा लोकसभेचे भाजपा निवडनुक प्रमुख सुमित वानखेडे यांनी चेतन याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. चेतन याने आपल्या यशाचे श्रेय आई – वडील, श्री वानखडे सर, श्री देवळे सर,
तसेच गावचे सरपंच बाळाभाऊ सोनटक्के यांनी मोलाचे मार्गदर्शन दिले व वरील सर्वांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले व नेहमी प्रोत्साहन दिले असे दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या