माध्यम साक्षारता ग्रामीण विकास संस्था, बोपापुर (दिघी) व कोरो इंडिया, संघटना मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंरोजगार व वन हक्क कायदा मार्गदर्शन कार्यशाळा दिनांक १२ मार्च २०२४ ला कोल्हापूर (राव) येथील चावडी सभागृह येथे घेण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सरपंच हरिश्चंद्र देवतळे, उद्घाटक दिपकजी मरघडे, विदर्भ विभाग प्रमुख, कोरो इंडिया, मुंबई, प्रमुख पाहुणे संतोष घुगे, सल्लागार माध्यम साक्षरता संस्था, ग्रामपंचायत सचिव विशाल गुल्हाने, माध्यम साक्षरता संस्थेचे संस्था प्रमुख विजय पचारे, ग्रामपंचायत सदस्य ललिता देवतळे व मालाताई मांढरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ग्रासरूट नेतृत्व विकास कार्यक्रम (GLDP) २०२३-२४ अंतर्गत सपोर्ट गट यांची क्षमता बांधणी होण्याच्या दृष्टीने स्वयंरोजगार व वन हक्क कायदा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन संस्थेचे लीडर राहूल मांढरे यांच्या वतीने करण्यात आले होते. सदर कार्यशाळेमध्ये कोल्हापूर (राव), हिवरा(का) आणि मलातपुर या ३ गावच्या नागरिकांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे उद्घाटनीय संवाद करतांना, वन हक्क कायद्याबाबत कोरो संघटनेचे विदर्भ विभाग प्रमुख दीपक मरघडे यांनी वन हक्क कायद्याचा इतिहास, पार्श्वभूमी व सामूहिक दावे दाखल करण्याची प्रक्रिया व त्यासाठी लागणारे कागदपत्रे तसेच ग्रामसभे मधून वन हक्क समिती गठन करण्यापासून तर दावा दाखल करणाऱ्या ग्रामसभेचे अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रशिक्षक व संस्थेचे सल्लागार, संतोष घुगे यांनी प्रशिक्षणार्थींना स्वयंरोजगार विषयावर सखोल मारदर्शन केले. प्रशिक्षण सत्र घेतांना त्यांनी व्यक्ती आणि समूह अश्या दोन्ही पद्धतीने आपल्या रोजगाराकडे बघितले पाहिजे. बदलत्या काळानुसार अनेक नवे रोजगार उभे करण्याचे क्षेत्र आज उपलब्ध आहे. ते क्षेत्र आणि त्यात आपली आवड ओळखून पुढे गेले पाहिजे आणि संघटीत पणे व्यवसाय केंद्रे उभारली पाहिजे. असे मत व्यक्त करून त्यासाठी लागणारी मदत व मारदर्शन आपण संस्थेकडून नेहमी पुरवत राहू असे आश्वासनही दिले.
कार्यक्रमाचा समारोपिय संवाद करताना माध्यम साक्षरता संस्था प्रमुख विजय पचारे यांनी ग्रासरूट नेतृत्व विकास कार्यक्रम २०२३-२४ च्या प्रक्रियेचा आढावा घेत गावामध्ये महिला व पुरुष तसेच विद्यार्थी यांचा भक्कम असा सपोर्ट गट लीडर च्या माध्यमातून तयार झाला आहे. हा सपोर्ट आणि वन हक्क समिती यांचे माध्यमातून गावाच्या विकास प्रक्रियेमध्ये मोठा हात भार लागो अशी आशा व्यक्त करत ज्यांचे प्रश्न त्यांचेच नेतृत्व उभे करण्यासाठी संस्था नेहमी तत्पर असणार आहे. ग्राम विकास प्रक्रिये मध्ये “पुढाकार तुमचा, सहभाग आमचा” असे म्हणत कार्यक्रमाचा समारोप केला. तर सरपंच देवतळे यांनी कार्यक्रमाला उपस्थित ग्रामस्थ, कार्यक्रमाचे उद्घाटक, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे संस्था प्रतिनिधी यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन तथा सूत्र संचालन माध्यम साक्षरता संस्थेचे लीडर राहुल मांढरे यांनी केले.