सिंदी रेल्वे ता. १५ : येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कट्टर शिवसैनिक राहुल जुमडे यांची उभाठा शिवसेनेच्या सेलु तालुका उपप्रमुखपदी जिल्हा प्रमुख श्रीकांत मिरापुरकर यांनी नुकतीच नियुक्ती केली आहे.
श्री जुमडे यांना यापुढे शिवसेना पक्षाची ध्येय धोरने, हिंदुत्वाची भगवी मशाल गावागावात पोहचवुन शिवसेना मजबुत करावी गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक हे धोरन तालुक्यात राबविण्याची जबाबदारी देण्यात आली.
जुमडे यांनी आपल्या नियुक्ती बद्दल जिल्हा प्रमुख मिरापुरकर, संपर्क प्रमुख निलेश धुमाळ, सहसंपर्क प्रमुख रविकांत बालपांडे आदीचे आभार मानले.
जुमडे यांचे सिंदी शहर प्रमुख सचिन लांबट, हेमंत भिसीकर, दिपक कवरती, मंगेश शिडाम, आशिष गवळी, मिरा वर्जे, सुनंदा टापरे, माधुरी बिजवार, जयश्री कातोरे, रोशनी लांबट आदीनी अभिनंदन केले आहे.
फोटो आहेत