कारंजा (घा) -: मॉडेल स्पोर्ट्स असोसिएशन कारंजा (घा) तर्फे स्व.नारायणराव काळे स्मृती मॉडेल सीनियर कॉलेजच्या मैदानावर पुरुष व महिलांचे खुले हॉलीबॉल सामने संपन्न झाले. यामध्ये एकूण 29 पुरुष संघांनी व ९ महिला संघानी सहभाग नोंदविला. आर्वी विधानसभेचे आमदार दादारावजी केचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत शिक्षण संस्थेचे सचिव तसा कृती उत्पन्न बाजार समितीआर्वी चे सभापती संदीप काळे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य धनवटे सर, प्राध्यापक मेश्राम सर,वर्धा जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश काळबांडे, शासकिय ठेकेदार सुदीपजी भांगे,कृ.उ.बा.स.चे माजी संचालक अरुणजी पालीवाल, शिवसेना नेते तथा स्वीकृत नगरसेवक नितीनजी दर्यापूरकर, नगरपंचायत चे उपाध्यक्ष भगवानजी बुवाडे, कृ.उ.बा.स.चे संचालक टिकारामजी मस्की, कारंजा पंचायत समितीचे उपसभापती प्रेमसिंग महिल्ले, नगरसेवक कमलेश कठाणे, राजुजी लाडके, विशालजी इंगळे, हेमंतजी बन्नगरे, समाजसेवक रवींद्रजी वाडीभस्मे, राहुलजी पैठणे, अभिजीतजी पेठकर, संतोषजी काकडे, शुभमजी जिवरकर, दीपकजी भारती,प्रा.सोनटक्के सर, प्रा.तागडे मॅडम, पत्रकार गजाननजी बाजारे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार दादारावजी केचे यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या व मॉडेल स्पोर्ट्स असोसिएशन च्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. यावेळी राजु काळपांडे, सतिश दर्यापूरकर यांचे हस्ते आमदार दादारावजी केचे व संदीपजी काळे यांचा सत्कार करण्यात आला..
मैदानाचे पुजन करून उद्घाटन सोहळा संपन्न झाला असे आमदार दादाराव केचे यांनी जाहिर केले..
उद्घाटन सोहळ्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये भाजपा वर्धा लोकसभा निवडणूक प्रमुख तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमितजी वानखेडे उपस्थित होते.यावेळी मंडळाचे सीनियर खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक राजु जसूतकर यांच्या हस्ते सुमितजी वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने नगरपंचायतच्या नगराध्यक्षा स्वातीताई भिलकर, आर्वी विधानसभेचे नेते सचिनजी होले, नगरसेविका योगिताताई कदम, जिल्हा परिषद चे माजी सदस सुरेशजी खवशी, भाजपा कारंजा मंडळ अध्यक्ष चक्रधरजी डोंगरे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रोशनजी चौधरी,पंचायत समितीचे माजी सभापती जगदीशजी डोळे,नागाझरी येथील सरपंच रमेशजी लोहकरे,सतीशजी घागरे, प्रफुल कामडी हे उपस्थित होते.सुमितजी वानखेडे यांच्या हस्ते मॉडेल्स स्पोर्टस् असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. मॉडेल स्पोर्ट्स असोसिएशन ची आंतरराष्ट्रीय खेळाडू रक्षा खेनवार हिच्या वडिलांचा सत्कार करण्यात आला.राष्ट्रीय खेळाडू श्वेता मानकर, वैष्णवी ढोबाळे, विश्वजित कुकडे, निरज जसुतकर,लक्ष्मी घुग्गुस्कर, पूजा वंजारी,यश पावडे, लेखिता चोपडे,पल्लवी पोकळे यांचा शाल श्रीफळ बुके व सन्मानचिन्ह देऊन सुमितजी वानखेडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच तीन वर्षापासून कारंजा ग्रामीण रुग्णालय येथे कार्यरत असणाऱ्या डॉ. स्मिता करणाके यांनी जवळपास तीन हजार सिजरिंग करून कारंजा परिसर व ग्रामिन भागातील अनेक गोरगरीब जनतेला सहकार्य केले आहे, निस्वार्थपणे त्यांची सेवा चालू असल्याने त्यानिमित्त डॉक्टर स्मिता करनाके उर्फ नारपाचे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. सोबतच कारंजा नगरीतील स्केटिंग खेळाचा खेळाडू ज्यांचीची श्रीलंका येथे होणाऱ्या स्पर्धाकरीता निवड झालेली आहे. चि. हितांशु प्रवीण गाखरे याचा सुद्धा सत्कार करण्यात आला. कारंजा शहरातील तरुणाकरीता सुसज्ज व्यायाम शाळेची व्यवस्था करणारे GT हेल्थक्लब चे मालक श्री.गौरव ठोंबरे यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र शासनाच्या माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये कारंजा तालुक्यातील प्रथम आलेल्या सनशाईन स्कूलच्या सर्व शिक्षक/शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला.सुनशाईन स्कूलच्या वतीने स्कूलचे प्राचार्य तथा अध्यक्ष प्रेमसिंग महिल्ले सर,पवन ठाकरे, हेमंत बन्नगरे, सौ.संगीताताई चाफले, सौ.ममताताई दिवाने, सौ.रंजनाताई कुबडे, सौ.मीनाक्षीताई बैगणे, सौ.आरतीताई खवशी, सौ.शालिनीताई पालीवाल, सौ.पुष्पाताई एकापुरे, सौ.चंचलताई जसांनी, सौ.सुप्रियाताई लोहारकर, सौ.दामिनीताई मदनकर, सौ. संगीताताई ढोले, सौ.शालिनीताई मोहोड, सौ.स्मिता साळवे, मंगेशजी भगत हे सर्व शिक्षक कर्मचारी सत्कार स्वीकारण्याकरता उपस्थित होते. सत्कार करताना सनशाईन स्कूल चे प्राचार्य प्रेमसिंग महिल्ले सर यांनी मॉडेल स्पोर्टस् असोसिएशन च्या सर्व सदस्यांना धन्यवाद दिले, व स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख सुमितजी वानखेडे यांनी उपस्थित सर्व खेळाडूंना व उपस्थितसर्वांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,अशा प्रकारच्या स्पर्धा होणे अत्यंत आवश्यक आहे, सर्व खेळाडूंचे व मॉडेल स्पोर्टस् असोसिएशन च्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले व नेहमी मॉडेल स्पोर्ट्स असोसिएशनच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन दिले व स्पर्धेला शुभेच्छा देत सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले..सुमितजी वानखेडे यांच्या हस्ते महिलांच्या मैदानाचे पूजन करुन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
स्पर्धेमध्ये एकूण २९ पुरुष व ९ महिला संघांनी सहभाग नोंदविला.बक्षीस वितरण सोहळ्याला ऍड.श्रीमती शोभाताई काळे, अध्यक्ष भारत शिक्षण संस्था आर्वी त्याचप्रमाणे भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या सचिव सौ. सरीताताई विजयजी गाखरे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौ.निताताई गजाम,नगरपंचायत च्या नगराध्यक्षा सौ.स्वातीताई भिलकर, सखी मंच च्या संचालिका सौ.माधुरीताई जसुतकर,सो.मांडवकर काकू, सुदीपजी भांगे,राजुजी काळपांडे, डॉ.स्मिता करणाके उर्फ नरपाचे, भाजपा वर्धा जिल्हा सचिव राजूभाऊ डोंगरे, सुरजीतसिंग अकली,विजयजी गाखरे, प्रेमसिंग महिले, नगरसेवक कमलेशजी कठाने, हेमंतजी बन्नगरे, समाजसेवक चंदूभाऊ जसुतकर,मनोजजी चरडे, गजाननजी भिलकर, कुंभरे साहेब, वैभव देशमुख,निलेश नरपाचे उपस्थित होते. ॲड. शोभाताई काळे व सौ.सरीताताई गाखरे यांचा सत्कार मॉडेल स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आला..
स्पर्धेतील पुरुष विभागातील प्रथम पुरस्कार अमरावती बॉईज, द्वितीय पुरस्कार युथ स्पोर्टस् काटोल A संघाला, तृतीय पुरस्कार युथ स्पोर्ट्स काटोल B संघाला देण्यात आले. तर वैयक्तिक पुरस्कार ज्यामध्ये मॅन ऑफ द टूर्नामेंट अमरावती बॉईज संघाचा मुफिज या खेळाडूला देण्यात आले, मॅन ऑफ द मॅच फायनल मॅच काटोल संघाचा साहिल वाभिटकर, बेस्ट लीफ्टर अमरावती बॉईज संघाचा सूर्योदय जीवाने, बेस्ट स्मॅशर युथ कटोल B संघाचा कृनाल भांगे, बेस्ट लिबेरो म्हणून काटोल युथ A संघाचा विषांत याला देण्यात आले..
तर महिला विभागामध्ये प्रथम पुरस्कार एस.के.एस.ए धापेवाडा संघ, दुतीय पुरस्कार मॉडेल स्पोर्टस् असोसिएशन कारंजा, तृतीय पुरस्कार कोल्हापूर संघ कोल्हापूर यांनी पटकाविला.तर वैयक्तिक पुरस्कारामध्ये वूमन ऑफ दी टूर्नामेंट धापेवाडा संघाची जयश्री ठाकरे,वुमन ऑफ द फायनल मॅच कारंजा मॉडेल संघाची लक्ष्मी घुग्गुस्कर, बेस्ट स्मशर ऑफ दि टुर्नामेंट कोल्हापूर संघाची दिव्या बोबडे, बेस्ट लिफ्टर धापेवडा संघाची वैष्णवी ढोबळे, तर बेस्ट लिबेरो मॉडेल कारंजा संघाची वैष्णवी चरडे हिला देण्यात आले.
उपस्थित सर्व खेळाडूंना सरिताताई गाखरे यांनी मार्गदर्शन केले. विजयी संघाला शुभेच्छा दिल्या, व मॉडेल स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेला यशस्वी झाल्याबद्दल असोसिएशनच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले..
स्पर्धे चे संचालन व आभार प्रदर्शन मॉडेल स्पोर्ट्स असोसिएशन चे अध्यक्ष दिलीप जसुतकर यांनी केले. डेकोरेशन चे काम पाहणारे कुंदन लोखंडे, जेवणाची व्यवस्था करणाऱ्या घागरे काकु, पंच म्हणून सहकार्य करणारे वर्धा येथील सुरज सर, आर्वी येथील शोएब सर,प्रतिक सर, तसेच खेळाडूंच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था व बक्षीसं करीता ज्या सर्व मान्यवर मंडळीनी सहकार्य केले त्याचे मंडळातर्फे आभार मानण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीते करीता मॉडेल स्पोर्ट्स असोसिएशन चे सर्व पदाधिकारी, आजी- माजी महीला पुरूष खेळाडू, तसेच मॉडेल सिनियर कॉलेज च्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले..