spot_img

*राजेंद्र जिकार ग्रामगीताचार्य पदवी ने सन्मानित”* वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यतिथी

समुद्रपूर: तालुक्यातील हळदगाव येथील युवक युवती विचार मंचाचे तालुका अध्यक्ष संवादिनी वादक श्री राजेंद्र जिकार यांना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ५६ वा पुण्यतिथी महोत्सव निमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदरपूर्वक शाल व श्री फळ व ग्रामगीता सन्मानपञ देऊन दि. २१ आक्टोबर रोजी सन्मानित करण्यात आले.वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जीवन योगी साहित्य लिखाना द्वारे सोशल मीडिया वर कोरोना काळापासून प्रचार-प्रसार वेगवेगळ्या गुरूदेव व्हाट्सऍप ग्रुपवर सुरू होता. आणि श्री गुरूदेव सेवा मंडळ व युवा मंचाचे तालुका अध्यक्ष म्हणून सेवा समर्पित केली होती आणि भजन कार्यक्रमात ते सक्रिय आहेत “ग्रामगीताचार्य”या सर्वोच्च पदवीने सन्मानित केल्याबद्दल सर्व गुरूदेव भक्तांनी त्यांचे अभिनंदन करुन आपल्या हातुन असेच श्री गुरुदेवाचे कार्य होत राहो. हि सदिच्छा व्यक्त केली. या प्रसंगी मंचावर अ. भा. श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी मा. श्री लक्षमण गमे. संमेलनाध्यक्ष सौ. पुष्पाताई बोंडे. अध्यक्ष संचालक. मंडळ प्रमुख मार्गदर्शक. जेष्ठ प्रचारक ग्रामगीताचार्य श्री. बाबाराव पाटील. प्रचार प्रमुख श्री. प्रकाश वाघ महाराज.उपसर्वाधिकरी दामोदर पाटील आदी मान्यवर या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या