spot_img

मतदार जागृतीसाठी जिल्ह्यातील 1 लाख 35 हजार विद्यार्थ्यांनी लिहिले नातेवाईकांना पत्र

वर्धा, दि. 24 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने आणि जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जिल्ह्यातील 1 हजार 273 शाळेतील 1 लाख 35 हजार 503 विद्यार्थ्यांनी पालक व नातेवाईकांना पत्र लिहून विधानसभा निवडणुकीत भय व भिती मुक्त वातावरणात तसेच कोणत्याही दबावाला, आमिशाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले.

जिल्ह्यातील 1 हजार 273 शाळांनी यामध्ये सहभाग घेतला असून सेलू तालुक्यातील 110 शाळांमधील 36 हजार 219 विद्यार्थी, आर्वी तालुक्यातील 209 शाळांमधील 18 हजार 451 विद्यार्थी, हिंगणघाट तालुक्यातील 222 शाळांमधील 28 हजार 526 विद्यार्थी, कारंजा तालुक्यातील 116 शाळांमधील 5 हजार 855 विद्यार्थी, समुद्रपूर तालुक्यातील 185 शाळांमधील 11 हजार 328 विद्यार्थी, आष्टी तालुक्यातील 81 शाळांमधील 5 हजार 407 विद्यार्थी, वर्धा तालुक्यातील 198 शाळांमधील 36 हजार 219 विद्यार्थी व देवळी तालुक्यातील 152 शाळांमधील 19 हजार 217 विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता.

मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे हे कर्तव्य बजावत असतांना सुजाण नागरिक म्हणून निवडणुकीत मतदान करा. लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी आपले मत मौल्यवान आहे. निवडणुकीत मतदान करताना कोणत्याही दबावाला, अमिषाला बळी न पडता निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजावावा, अशा आशयाचे पत्र शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या नातेवाईकांना लिहिले आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदार जागृती होणार असल्याची माहिती स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. मंगेश घोगरे यांनी दिली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या