spot_img

*डॉ. पंजाबराव देशमुख गृहनिर्माण संस्थेतील 102 भूखंडांना नगररचना विभागाची कार्योत्तर मंजुरी द्या* गृहनिर्माण संस्थेची राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे मागणी

वर्धा- शहरालगतच्या पिपरी मेघे परिसरातील डॉ. पंजाबराव स्मृती जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन होऊन आता 54 वर्षे झाली आहे. दहा एकर परिसरात वसलेले या गृहनिर्माण संस्थेमध्ये 102 कर्मचारी राहत असून येथील भूखंड धारकांना नियम शिथिल करून कार्योत्तर मंजुरी द्यावी अशी मागणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून या मागणीचे निवेदन आज राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांना स्थानिक विश्रामगृह येथे देण्यात आले. या गृहनिर्माण संस्थेत 102 कर्मचारी राहतात. 10 एकर जमिनीवर वसलेल्या संस्थेच्या जमिनीला आकृषक म्हणून सुरुवातीला मान्यता प्राप्त झाली. चंद्रपूर नगर रचना कार्यालयाने 76 प्लॉटच्या लेआउट वर काही आक्षेप घेऊन प्रस्ताव पूर्तते करीता संस्थेला परत केला परंतु त्यावेळी संस्थेने 76 प्लॉटच्या नकाशाची पूर्तता न करता 102 प्लॉट तयार केले कारण कर्मचाऱ्यांची गरज व मागणी होती. नंतर संस्थेच्या कार्यकारिणीने नगररचना कार्यालयाला अर्ज केला भेटी दिल्या परंतु काही आक्षेप घेतले त्याची पूर्तता करण्यासाठी काही घरे पाडावे लागतील आणि ते संस्थेला शक्य नाही. पूर्ण 102 प्लॉटचे सातबारा तयार झाले असून सर्व सदस्य ग्रामपंचायत पिपरी मेघे येथे नियमित मालमत्ता कर भरत आहे. परंतु सदर 102 भूखंडांना नगर विकास विभागाची परवानगी नसल्याकारणाने अनेक कर्मचाऱ्यांना कर्ज घेण्यास तसेच विक्री कार्यालयाशी संबंधित इतर प्रशासकीय अडचण झाली आहे. परंतु मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्य काळामध्ये अनधिकृत भूखंडांना अधिकृत करण्याची योजना होती, त्याच धर्तीवर डॉ. पंजाबराव देशमुख गृहनिर्माण संस्थेतील 102 भूखंडांना कार्योत्तर मंजुरी देण्याची विनंती चे निवेदन आज राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांना संस्थेच्या वतीने देवर्षी बोबडे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष फारुख शेख, भारतीय जनता पिपरी (मेघे) सर्कल अध्यक्ष रवींद्र शेंडे व भारतीय जनता युवा मोर्चा प्रमुख राहुल भांडे यांनी दिले. निवेदन दिले असता राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी तात्काळ मा. उपविभागीय अधिकारी वर्धा यांना बोलून सदर प्रकरणी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या