अज्ञात चोरट्यांने कुलूप तोडून चोरुन नेले ६३ हजार रुपये किमतीचे ऐवज केले लंपास.
*हिंगणघाट प्रतिनिधी सचिन महाजन*
हिंगणघाट येथील यशवंत नगर मॉस्टर कॉलनी येथील घरात अज्ञात चोरट्यांने घराचे कुलूप तोडून घरील कपाटातून नगदीसह ६३ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची माहिती आज रविवारी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. प्राप्त माहितीनुसार शरद अवचट २७ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता घराला कुलूप लावून आपल्या कुटुंबासह शहरातील रंगारी वार्डातील राहणाऱ्या सासऱ्याकडे गेले होते. २८ डिसेंबरला सकाळी साडेदहा वाजता घरी परत आले असून त्यांना घराचे मुख्यदाराचे कुलूप तुटून दिसले यावेळी त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील कपाटातील सामायन अस्थव्यस्त पडुन दिले त्यांना कपाट बघितले असता कपाटातील नगदीसह ६३ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याचे निदर्शनास आले यासंबंधी हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

