
वरूड :तालुका प्रतिनिधी :-
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई तालुका शाखा वरूड व स्व. मथुराबाई प्र. ठाकरे चॅरिटेबल ट्रस्ट,महात्मा फुले कला वाणिज्य व सितारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालयाचे संयुक्त विद्यमाने जेष्ठ पत्रकार स्व. नेमचंद शहा आणि जेष्ठ पत्रकार स्व. संजय बेले यांच्या व स्मृती प्रित्यर्थ द्वारा आयोजित ” पत्रकार दिन व विद्यार्थी मार्गदर्शन सोहळा”संत्रा नगरी वरुड शहरामध्ये २३ जानेवारी रोज गुरुवाला सकाळी ११ वाजता महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित केला आहे.
. .. पत्रकार दिनाचे औचीत्य साधून मराठी वृत्तपत्राचे जनक स्व. बाळ शास्त्री जांभेकर यांची जयंती, पत्रकार दिन, विद्यार्थी मार्गदर्शन सोहळाचे कार्यक्रमाचे उद्घाटक मोर्शी विधानसभा मतदार संघ आमदार उमेश ऊर्फ चंदुभाऊ यावलकर,कार्यक्रमाचे अध्यक्ष संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे संचालक श्रीकांत पाटील,विशेष अतिथि पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद,आयपीएस डॉ. श्रेणिक लोढा मुंबई,खंडेलवाल ज्वेलर्स संचालक राजेश खंडेलवाल,जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार अमरावती,प्रमुख अतिथिमाहिती अधिकारी अपर्णा यावलकर,प्राचार्य डॉ. दिलीप हांडे,पश्चिम विदर्भ प्रमुख महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नयन मोंढे,परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक निलेशकुमार बेलसरेअमरावती,जिल्हाध्यक्ष प्रविण शेगोकार ,अध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख फाउंडेशन डॉ. भुषण खोले , संपादक गिरिधर देशमुख उपस्थित राहणार आहे. तर विद्यार्थ्यांना “तणावमुक्त अभ्यास” या विषयावर नामांकित वक्त्याचे मार्गदर्शन करण्यात येणार असुन प्रमुख वक्ते म्हणून डॉ. चिदानंद फाळके नाशिक डॉ.मनोज साल्पेकर नागपुर उपस्थीत राहणार आहे. तर पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार स्व.नेमचंद शहा स्मृती पुरस्कार २०२४ दैनिक वरुड केसरी संपादक प्रविण वसंतराव सावरकर यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावंताचा सत्कार सुद्धा करण्यात येणार आहे या मध्ये सत्कार मूर्ति माजी कृषी मंत्री तथा श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती.अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख,अमरावती शहर पोलीस विभाग उपायुक्त सागर पाटील,संपादक राष्ट्रीय हिंदी साप्ताहिक ‘जीरो माइल’संस्थापक अध्यक्ष ‘जीरो माइल फाउंडेशन’ नागपूर डॉ. आनंद शर्मा,जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बहुरूपी,प्रा.अनिल जावळे,अशोक चौधरी,उपजिल्हा रुग्णालय मोर्शि,वरूड वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार,अरुणा सतीश वसुले (टोगसे)जरुड,समाजसेवक जितेंद्र शर्मा यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या पत्रकार दिन, विद्यार्थी मार्गदर्शन सोहळाचे कार्यक्रमाला उपस्थीत राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई तालुका शाखा वरूड व स्व. मथुराबाई प्र. ठाकरे चॅरिटेबल ट्रस्ट,महात्मा फुले कला वाणिज्य व सितारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालयाचे वतीने करण्यात आले आहे.

