*ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. पि.एल. सिरसाठ यांची पुण्यतिथी संपन्न.

- अकोला प्रतिनिधी :
- महाराष्ट्रातील ग्रामीण पत्रकारांना न्याय मिळावा या हेतूने प्रेरित होऊन स्वर्गीय पि.एल. सिरसाठ यांनी ग्रामीण पत्रकार संघ ३५ वर्षांपूर्वी स्थापन केला. ग्रामीण पत्रकारांना न्याय मिळावा म्हणून नागपूर अधिवेशन, मुंबई व अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चा , सत्याग्रह , लेखी निवेदन , धरणे आंदोलने यांच्या माध्यमातून श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक २१जानेवारी २०२५ ला केंद्रीय कार्यालय अकोला येथे ग्रामीण पत्रकार संघाचे वतीने अभिवादन सभा घेण्यात आली . स्वर्गीय पि.एल शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्याध्यक्षा चंदाताई प्रकाशराव शिरसाठ यांच्या अध्यक्षते खाली ही अभिवादन सभा संपन्न झाली. याप्रसंगी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये राज्य उपाध्यक्ष पी एन बोळे , राज्य सचिव संजय वानखडे , राज्य कोषाध्यक्ष गजानन हरणे , जिल्हाध्यक्ष विलास नसले , मुर्तिजापुर तालुकाध्यक्ष अतुल नवघरे , संतोष माने , उपाध्यक्ष अनिल भेडकर, यांनी प्रमुख उपस्थिती होती. सर्वांनी स्व. पि.एल .सिरसाठ यांचे जीवनावर प्रकाश टाकला . याप्रसंगी जिल्ह्यातून ग्रामीण पत्रकार. बहुसंख्येने ग्रामीण पत्रकार उपस्थित होते.