वर्धा : सद्गुरू परमहंस श्री कृष्णगीरी महाराज यांचा वार्षिक पुण्यतिथी महोत्सव २०२५ आणि स्वर्गीय शंकरबाबा गुल्हाने व स्वर्गीय विमलआई शंकरराव गुल्हाने यांच्या पावन स्मृती प्रित्यर्थ आयोजीत संगीतमय श्रीमद भागवत कथा आरंभ झाली कथा प्रवक्त्या ह. भ. प. देवी वैभवी श्रीजी यांच्या पावन अमृत वाणीतून या कथेचे महत्व सांगत असताना त्या म्हणाल्या की संत व सहग्रंथ आपल्याला प्रकाशित करतात. जीवनात तत्पर राहण्याकरिता म्हणजे व्यथा दूर करण्याकरिता भागवत कथा आहे. लोकांचे मत परिवर्तित होते. पण श्रीमद परिवर्तनशील नाही. संतांच्या संगतीने मनोमार्ग गती आपला उद्धार होऊ शकतो. असे भागवत कथेचे महत्व उपस्थित भाविक भक्तांना आपल्या अमृत वाणीतून सांगत होत्या. यावेळी महिला व पुरुष वर्गाची विशेष उपस्थिती होती तसेच रात्री १० वाजता माननीय चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य,तसेच माननीय डॉ पंकज भोयर राज्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा ,भाजपा नेते सुधीर दिवे ,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे युवा नेते अतुल वांदीले यांनी कृष्णगीरी धाम येथे उपस्थिती दर्शविली. कृष्णगिरी महाराजांचे दर्शन करून श्रीमद भागवत या धार्मिक आध्यात्मिक पिठाचे दर्शन घेतले.याप्रसंगी राज्याचे नवनिर्वाचित महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांचे कृष्णगीरी परिवाराचे वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सर्वांना मार्गदर्शन करून व प्रसाद ग्रहण केला. याप्रसंगी भाविकभक्ताची प्रचंड अशी उपस्थिती होती.