spot_img

*आनंददायी शनिवारचा उत्साह – जिजामाता विद्यालय, वर्धा*

 

 

वर्धा: गीताई नगर येथील जिजामाता विद्यालयात आनंददायी शनिवार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना गीताई मंदिर व विश्वशांती स्तूप येथे शैक्षणिक सहलीसाठी नेण्यात आले.

विद्यार्थ्यांना गीताई मंदिराच्या ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली, तसेच जमनालाल बजाज यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. चारूलता येळणे यांनी विद्यार्थ्यांना विश्वशांती स्तूपाच्या स्थापनेचा उद्देश,हेतू व. त्याची वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्ये आणि शांततेचा संदेश याविषयी अभ्यास पूर्ण सखोल मार्गदर्शन केले. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म यांची अनमोल जोड मिळाली.याशिवाय, विद्यार्थ्यांसाठी सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले, ज्यामुळे त्यांनी सहभोजनाचा मनमुराद आनंद घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये समूहभावना, सामाजिक जाणीव आणि इतिहासाविषयी कुतूहल जिज्ञासा निर्माण झाले.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका चारूलता येळणे तसेच शिक्षकवृंद सुनील धवणे, नरेश बांगडे, दिनेश गोमासे, आशिष पोहाणे, दमयंती वाघमारे, विजयश्री साळुंखे, निर्मला तवले यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनीही या सहलीचा उत्साहात लाभ घेतला आणि आनंददायी शनिवारी नवीन ज्ञान व अनुभव मिळवला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या