spot_img

*कर्मयोगीची १०१ सायकल वाटपाची यशस्वी संकल्पपूर्ती …*

 

नागपूर :कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे आईवडिलांचे छत्र हरवलेल्या व गरजवंत मुलांचा शिक्षणातील उत्साह वाढविण्यासाठी व त्यांनाही कोणाचा तरी आधार आहे ही जाणीव करून देण्यासाठी सायकल वाटपाचा उपक्रम २०२२ पासून सुरू करण्यात आला आहे.

२०२४ मध्ये सुध्दा कर्मयोगी कडून १०१ सायकल वाटपाचा संकल्प करण्यात आला होता. या संकल्पाची संकल्पपुर्ती कर्मयोगी फाऊंडेशन व कॅल्डेरीस इंडिया रिफ्रॅक्ट्रीज लिमिटेड बुटीबोरी यांच्या सौजन्याने दि. ९ फेब्रूवारी २०२५ ला आई सभागृह बुटीबोरी येथे करून या दुःखाचा डोंगर कोसळलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत १०१ सायकल वाटपाचा संकल्पपूर्ती सोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे आतापर्यंत कर्मयोगी कडून ४०३ सायकलचे वाटप करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ इंडस्ट्रीयल पॉवर लिमिटेड बुटीबोरीचे साह्यक उपाध्यक्ष संजय जुमडे उदघाटक कॅल्डेरीसचे फायनान्स डायरेक्टर अविनाश कहाले, प्रमुख उपस्थितीमध्ये कॅल्डेरीसचे डायरेक्टर इंडस्ट्रीयल ऑपरेशन सत्येंद्र कुमार, कॅल्डेरीसचा सीएसआर हेड उत्सवी दीपक, प्लांट हेड सुबोध दुबे, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ जोध व सामाजिक कार्यकर्त्या मनीषा लाकुडकर ही मंडळी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होती..

यावेळी अध्यक्षीय भाषणात संजय जुमडे म्हणाले की कर्मयोगी मोठ्या प्रमाणात या भागात दुःखीकष्टी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे कार्य करत आहे. मी तर कर्मयोगीचा आदर सत्काराने व नियोजनाने भारावून गेलो आहे.

यावेळी प्रमुख उपसथितीमध्ये असणारे सत्येंद्र कुमार म्हणाले की कर्मयोगी पकाज ठाकरे यांच्या नेतृत्वात अतिशय प्रभावी कार्य करत आहे. आमची कॅल्डेरीस कंपनी ग्रामीण भागात कार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे व पुढेही आम्ही कर्मयोगी फाऊंडेशन सोबत कार्य करू असे ते यावेळी आवर्जून म्हणाले.

या कार्यक्रमाला, डॉ. प्रशांत कडू, दिनकर कडू देविदास लाखे, रक्षित बनसोड, शेषराव नागमोते कॅल्डेरीस परीवार, कुंभारे सर ही प्रतिष्ठित मंडळी व जवळपास शंभर गावातील मंडळी हा संकल्पपूर्ती सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने आली होती..

कर्मयोगी परिवार व कॅल्डेरीस परिवार यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या