spot_img

*छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धा*

 

सेवाग्राम:- लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वर्धा येथील यशवंत महाविद्यालयाच्या सभागृहात दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. आजच्या युवकांसमोर अनेक आवाहने आहेत.छत्रपती शिवाजीराजे यांचा इतिहासच युवकांच्या आवाहानांना उत्तर आहे. आजघडीला त्यांच्या पराक्रमाचा इतिहास समजावून घेणे आवश्यक आहे.त्याचे तेजोमय विचार कार्य हे अध्ययनातून समजून घ्यावे.त्यांची मांडणी करावी यासाठी वक्तृत्व स्पर्धाचे आयोजित करण्यात आलेले आहे.

यात अ गटात वर्ग ५ ते ८ साठी स्वराज्याचे शिल्पकार: छत्रपती शिवाजी महाराज आणि ब गटातील वर्ग ९ ते १२ वी साठी आजचा युवक आणि छत्रपती शिवाजी महाराज असा विषय ठेवण्यात आलेला आहे.

वक्तृत्व स्पर्धा सकाळी १०.०० वाजता सुरू होईल.स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, यशवंत महाविद्यालय वर्धा, यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सेवाग्राम यांच्या वतीने करण्यात आले आहे.मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन समितीचे प्रा.उमाकांत डुकरे, विशाल जाचक आणि दिलीप चव्हाण यांनी पत्रकातून केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या