spot_img

*महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी व गौरव समारंभ संपन्न* *आदर्श शिक्षिका सौ.रंजना उईके “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” पुरस्काराने सन्मानित*

वर्धा – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा वर्धा यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिला आरोग्य तपासणी तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीने आर्वी तालुक्यातून जळगाव येथील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षिका सौ.रंजना नरेश उईके यांची निवड करून त्यांना”क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सन्मान” हा पुरस्कार वर्धा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी जितीन रहमान यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .या प्रसंगी शिक्षक समितीचे प्रमुख मान्यवर व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी आरोग्य तपासणी वेळी महिला शिक्षकांना मार्गदर्शन केले.तसेच महिला सक्षमीकरण व शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल बद्धल जिल्ह्यातील शिक्षिकांचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. रंजना नरेश उईके यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव, पंचायत समिती आर्वी, जिल्हा वर्धा शिक्षक समितीचे आभार मानले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे आर्वी तालुक्यातील शिक्षक व शिक्षिका वर्ग व त्यांचेसोबत इयत्ता १ली ते १० पर्यंत शिक्षण घेतलेले वर्ग मित्र गजानन सरोदे,संजय देसाई, शेखर भडके,प्रवीण मालपाणी, मनोज दापूरकर , मनोज पराते, प्रवीण रुंधे, ज्ञानेश पराळे ,वृंदा मसने,सविता वानखडे, मिनाक्षी रहाटे, कांचन मालपाणी ,मुक्ता सरोदे यांनी अभिनंदन केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या