शिक्षणाचे बाजारीकरनातून
अनं सरकारचे औद्योगिक बेताल धोरणातून
जन्म घेत असते ही बेरोजगारी…
ती असते शहरीभागात, झोपडपट्टीत,चाळीत,ग्रामीण भागातून,गाव खेड्यात असतो तिचा न संपणारा प्रवास..भारतभर कुठेही….
कधी बकाल वस्तीतील गुंडशाही होऊन,
जुवार अड्ड्यावर शिगारेटचे झुरके ओढीत दारूचे घोट पीत बेरोजगारी पडली असते निपचित
गावात गल्लीबोळात मजनू बनून फिरत असते ती
कधी बारमध्ये,
नुसताच आकांततांडव करीत सरकारचे नावावर..
बेरोजगारावर आधारित सरकारी धोरणाच्या दिशेने औद्योगिक शिक्षण घेऊन ती जेव्हा चालू करेल आपला मजल दरमजल प्रवास….
ग्रामीण शहरी उद्योगावर आधारित दालनात उध्योमिता धोरणावर आधारीत शिक्षण जेव्हा सुरू होईल …
तेव्हा सुरू होईल तीचे थांबे..
नवीन कंपन्यांचे जाळे जेव्हा विणले जाईल भारतात ,स्व उद्योग निर्मिती होईल
तेव्हा
खचितच कमी होईल तिचा प्रवास…
खचितच कमी होईल तिचा प्रवास…
*****************************
*साहित्यिक*
*नरेंद्र सा. गुळघाने*
तळेगाव /वर्धा
*****”****””*””””””*******””*****””****