spot_img

समाजसेवी उद्योजक बी. एस. देशमुख बाप्पू यांच्या ६१ चे दिनांक २८ला आयोजन.

अकोला.

अकोला महानगरा मध्ये स्वकर्तुत्वाने, जिद्दीने, मेहनतीने नाविन्यपूर्ण प्रयोग ,कार्य करीत असलेले उद्योजक समाजसेवी
आदरणीय व्यक्तिमत्व बी.एस. बाप्पु उर्फ बाबुराव साहेबराव देशमुख यांची दिनांक २८ मार्चला २०२५ संध्याकाळी ७ वाजता नेहरु पार्कमध्ये ६१ चे त्यांच्या परिवाराच्या वतीने मोठ्या धुमधडाक्यात आनंद उत्साहात साजरी होत आहे. त्यानिमित्य त्यांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न. माणूस म्हटले की स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी जगण्याची धडपड करणारा व्यक्ती म्हणजे माणूस आपण समाजामध्ये सगळीकडेच पाहत असतो. परंतु स्वतः सोबतच स्वतःच्या परिवारासोबतच समाज हितासाठी झटणारा, लढणारा, ध्येयवेडा माणूस अकोला शहरांमध्ये राहतो. सुरुवातला गणेश इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून नवीन नवीन प्रयोग करणारे व त्या माध्यमातून वैज्ञानिक पिढी घडवण्याच्या वसा घेतलेले बी.एस .बापू अनेकांनी पाहिले आहे. प्रिंटिंग प्रेस चा व्यवसायाचा सुद्धा त्यांनी अनुभव घेऊन कार्य केले आहे .आपला व्यवसाय सांभाळत असताना आपल्या व्यवसाया सोबतच समाज हितासाठी सुद्धा सातत्याने जगणारे व्यक्तिमत्व फार कमी दिसतात. त्यातील एक व्यक्ती म्हणजे ज्यांना सर्वजन बी. एस. बाप्पू या नावाने संबोधतात .माणसाच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात, काही चांगले, काही वाईट ,काही कधीच लक्षात न राहणारे, आणि काही कायमचे मनात घर करणारे ,मनात घर करणारी जी अनेक माणसं जगताना लाभली ,त्यातलेच एक, बी. एस .बापू आहेत. म्हणूनच मला वाटते बापूसाहेब व्यक्तिमत्व आपका शान है हमारी, कर्तुत्व आपका पहचान है हमारी, हीफाजत करना है, जिंदगी की, क्यूकी सासे आपकी, जान है हमारी. अशा सर्वांना आपलेसे वाटणारे व प्रत्येकाच्या अडी अडचणी मध्ये स्वतः सहभागी होऊन समोरच्याला मदतीचे दानत्व देणारे .त्यासोबत आपला उद्योग व्यवसाय सांभाळून सामाजिक बांधिलकीने सातत्याने कार्य करीत असलेले अकोला शहरातील सर्वांचे लाडके “बाप्पू” डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. नेहरू पार्क च्या संघर्षानंतर पार्कचा कायापालट करून शहरातील लोकांना आनंद देणारा पार्क तयार करण्याचे काम बाप्पू साहेबांनी अनेक प्रयोग करून सातत्याने केले. भंगार असलेल्या नेहरू पार्कला वैभव प्राप्त करून त्या ठिकाणाला क्रांतिकारक चळवळीचे ठिकाण बनवले .अनेक छोटे-मोठे सामाजिक कार्यक्रम ,विविध सामाजिक संस्था संघटनेच्या बैठकी ,कार्यशाळा, जाहीर सभा या नेहरू पार्क मधून सातत्याने होत असतात व त्या कार्याला बापूंचा नेहमी हात पुढेच असतो. कोणतेही सामाजिक कार्य करण्यासाठी शहरातील कोणी व्यक्ती बापूसाहेबांकडे गेल्यावर वापस आल्याचे मी अजून ऐकले नाही. जो येईल त्याला जमेल तसी मदत कार्य करण्याचे महान कार्य बापूसाहेब अविरतपणे करीत असतात. तसेच या पार्क मधून नवनवीन प्रयोग सातत्याने ते करीत असतात .त्याचा फायदा अकोलेकरांना नेहमीच होत आहे. निसर्ग, विज्ञान , आध्यात्म व प्रयोगशीलता या माध्यमातून लोकांना आनंद देण्याचे कार्य सातत्याने बी एस बापू करीत असतात. बापूच्या जीवनामध्ये अनेक घटना घडामोडी बदल झालेले आहेत.परंतु त्याला न घाबरता जिद्दीने परिश्रमाने एक पाऊल पुढे टाकण्याचे काम बी.एस. बापू करीत आहेत. प्रगतीची ही वाटचाल सातत्याने चालू आहे. वाडेगाव रोडवर असलेला अविनाश ऍग्रो टुरिझम पार्क व त्यामध्ये जनते करता नवनवीन उपक्रम सातत्याने त्यांचे चालू असता. त्या माध्यमातून लोकांना आनंद देण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत त्या सोबत गणेश इनोव्हेशन, सिम किड्स स्कूल शाळा, असे अनेक दालनाच्या माध्यमातून ते सातत्याने कार्यमग्न असतात. तरीही एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये सामाजिक बांधिलकी त्यांनी कधी सोडली नाही. कोणताही शहरातील सामाजिक उपक्रम ,आंदोलन कार्यक्रम असो बापूसाहेबांची कला ,कसुरी ,योगदान सातत्याने त्या कार्यामध्ये असते. दरवर्षी पंजाबराव देशमुख यांच्या जयंती उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सन्मान करण्याचे कार्य सुद्धा ते सातत्याने गेल्या कित्येक वर्षापासून अविरतपणे करीत आहेत. चेहऱ्यावर नेहमी हास्य व दुसऱ्यालाही हास्य देण्याचे कार्य त्यांचे हातून होत असते . विविध सामाजिक संस्था संघटनेच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य सातत्याने चालूच आहे. त्यासोबत आपल्या उद्योग व्यवसायाकडे सुद्धा तेवढ्याच ताकदीने ते वेळ देऊन नवनवीन प्रयोग करून नवनिर्मिती करण्याचे कार्य नेहमी करीत असतात . एक यशस्वी उद्योजक, यशस्वी पिता, यशस्वी समाजसेवक अशा अनेक कार्यात त्यांनी यश मिळवू नावलौकिक मिळवली आहे .तरीही आपले प्रत्येक पाऊल जमिनीवर टाकून चालत असतात .लहान असो मोठा असो सर्वांना सोबत घेऊन मानसन्मान ठेवून जीवनामध्ये अनेक उपक्रम ते यशस्वी करीत असतात .आपला परिवार एकत्रित ठेवून त्यांच्या प्रगती सोबतच समाजाची सुद्धा प्रगती झाली पाहिजे हा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून ते सातत्याने कार्य मग्न असतात. शाहू, फुले ,आंबेडकर, पंजाबराव देशमुख, गाडगेबाबा आदी थोर महापुरुषांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचे कार्य ते सातत्याने आपल्या जीवनामध्ये करीत आहेत. वय ६१ झाल्यावरही अजूनही तरुणाला लाजवेल असा त्यांच्या कार्याचा व्याप मोठा असून त्यामध्ये ते नेहमी कार्यमग्न असतात. व आपल्या व्यावसायिक कार्यासोबतच सामाजिक उपक्रम सुद्धा सातत्याने राबवित असतात. अनेक जाती पंत पक्ष संघटना यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना एका माळेत संघटित करण्याचे काम सुद्धा ते सातत्याने करीत असतात.
अशा सेवाभावी व्यक्तिमत्व असलेल्या बापू साहेबांची “एकसष्ठी” साजरी होताना मनस्वी सर्वांना आनंद होतो आहे. त्यानिमित्ताने त्यांनी केलेल्या सहा दशकांच्या जीवन प्रवास आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. आपणासारख्या अनेकांना जीव लावणाऱ्या जीवाभावाच्या मित्र मंडळीचे, थोरामोठ्यांचे प्रेम, सहकार्य, आशीर्वाद ठाई ठाई त्यांना लाभले आहेत व आजही लाभत आहेत. त्याचीच परिपूर्ती म्हणजे बी एस बापू यांची आज पर्यंत ची यशस्वी वाटचाल होय. ही वाटचाल भविष्यातही सुकर व्हावी, आपल्या सर्वांच्या प्रेमाच्या फुलांचा, आशीर्वादाचा बापूसाहेबांवर सदैव वर्षाव व्हावा ! बापू साहेबांना प्रसिद्धी आवडत नाही. ते कधीही प्रसिद्धीच्या मागे लागलेले नाही .तरीपण तुमच्या आमच्या अनेकांच्या जीवनात बदल घडून आणणारे, सातत्याने कार्यमग्न असणारे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व बापूसाहेब यांचा ६१ वी या सोहळ्या निमित्याने आपण लिहिलं पाहिजे व एक जाणत नेतृत्व त्यानिमित्ताने समाजासमोर आलं पाहिजे हा उदात्त दृष्टिकोन ठेवून हा लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. हा लेख प्रार्थनीय आहे .हा लेख सर्वांना आवडो ,त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळो या सदिच्छांसह त्यांना या ६१वी नित्यत लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा!! तुम जियो हजारो साल, साल के दिन हो कोटी हजार! या मंगलमय दिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.!!बी. एस. बाप्पू देशमुख यांचा मोबाईल नंबर….
+91 94228 61746 यावर शुभेच्छा देऊन त्यांना शुभेच्छा, प्रेरणा, ताकद देण्याचे काम आपण करावे ही नम्र विनंती त्यांच्या या एकसष्ठीचे सस्नेह निमंत्रण त्यांच्या परिवाराने सर्व मित्रमंडळींना दिलेली आहे
आदरणीय बी.एस. बाप्पु उर्फ बाबुराव साहेबराव देशमुख
यांच्या “एकसष्ठी” साजरी करताना मनस्वी सर्वांनाच आनंद होतो आहे. त्यांच्या सहा दशकांच्या जीवन प्रवासात आपणासारख्या जीव लावणाऱ्या जीवाभावाच्या मित्र मंडळीचे, थोरामोठ्यांचे प्रेम, सहकार्य, आशीर्वाद ठाई ठाई लाभले आहेत व आजही लाभत आहेत. त्याचीच परिपूर्ती म्हणजे आज पर्यंत ची यशस्वी वाटचाल. ही वाटचाल भविष्यातही सुकर व्हावी, आपल्या प्रेमाच्या फुलांचा, आशीर्वादाचा सदैव वर्षाव व्हावा याच सदिच्छेतून या कार्यक्रमाचे हे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यासाठी आपण सर्वांनी अनमोल उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपल्या सर्वांची वाट बघतोय आपल्या आगमनाची शुक्रवार दि. २८ मार्च २०२५ वेळ : सायं ७ ते १० पर्यंत नेहरू पार्क अकोला येथे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती आयोजक कुणाल बाबुराव देशमुख, सुयेश विजयराव पाटील, रोहित गुणवंतराव सरनाईक, साहील खुशालराव देशमुख,सौ. इंदुताई बाबुराव देशमुख,सौ. अश्विनी कुणाल देशमुख सौ. कोमल सुयेश पाटील सौ. वैष्णवी रोहीत सरनाईक,सौ. सुरेखा खु.देशमुख,खुशालराव साहेबराव देशमुख आदींनी उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.

शुभेच्छुक….
गजानन हरणे ,समाजसेवक.
खडकी ,अकोला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या