spot_img

श्रीगुरूदेव युवामंचाची मागणी. सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भेटीचा फलक असावा : ज्ञानेश्वर रक्षक

नागपूर:

महात्मा गांधी आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारीक मतभेदावर खुप चर्चा होते. पुणाकरार यावर आंबेडकरी अभ्यासकात प्रचंड संताप आहे. पुणा करार १९२५ चा आहे. पण त्यानंतर या दोन्ही महापुरूषात अनेकदा भेटी होऊन राष्ट्रहीतावर चर्चा झाल्याचे फार क्वचीत प्रबोधनातून लिखानातून वाच्यता केल्या जाते.
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक भेट सेवाग्राम आश्रमात झाली. त्यावीषयी सेवाग्राम आश्रम परिसरात बापू कुटीतील फलकावर काही महापुरूषांच्या भेटींचा उल्लेख असलेला फलक आहे त्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख नाही.
पण सेवाग्राम आश्रमपासन हाकेच्या अंतरावर असलेल्या बुध्दविहारात एका फलकावर हा भेटी संबधीत फलक लावलेला आढळतो. त्यात खालील मजकूर नमूद आहे.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती स्थळ’
‘दि. १मे १९३६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची भेट श्री. जमनालालजी बजाज यांनी गांधी आश्रम सेवाग्राम येथे घडवून आणली. या भेटीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाग्राम या जागी लोकांच्या भेटीसाठी आले. त्यावेळी या विहाराच्या परिसरातील या दगडावर बसून त्यांनी गावकर्‍यांसोबत चर्चा केली. शिक्षणाचे महत्व समजावून सांगीतले. शिक्षणामुळेच आपली व समाजाची प्रगती होईल तसेच स्वच्छ रहा असे मौल्यवान मार्गदर्शन सुद्धा त्यांनी केले.’
महात्मा गांधी आणि डाॅ. बाबासाहेब यांच्या साहित्यावर अभ्यास करणाऱ्यांनी या ऐतीहासीक चर्चेचा इतीहास शोधून काढावा. तसेच सेवाग्राम आश्रमाने बापु कुटीच्या परिसरात या ऐतीहासीक घटनेचा फलक दर्शनी भागात लावावा. अशी मागणी श्रीगुरूदेव युवामंचाचे प्रवर्तक ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी केली आहे.

शब्दांकन :
: ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
प्रवर्तक श्रीगुरूदेव युवामंच
9823966282

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या