spot_img

महाराष्ट्र माझा

हा दिवस महाराष्ट्राच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी झालेल्या मुंबई राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र दिन सामान्यतहा परेड आणि राजकीय भाषणे तसेच समारंभाशी संबंधित आहे. तसेच इतर विविध सार्वजनिक ठिकाणी आणि खाजगी कार्यक्रमाबरोबरच महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा या दिवशी साजरी करतात. महाराष्ट्राच्या मराठी भाषिक राज्याच्या निर्मितीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. राज्य पुनर्रचना कायदा, 1956 नुसार भाषांच्या आधारे भारतातील राज्यांसाठी सीमा परिभाषित केल्या गेल्या. या कायद्याचा परिणाम म्हणून जे मुंबई राज्य निर्माण झाले ते मात्र वेगवेगळ्या मराठी, गुजराती, कच्ची आणि कोकणी भाषा बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्राचे मिळून बनले होते. संयुक्त महाराष्ट्र समिती मुंबई राज्याचे दोन राज्यात विभाजन करण्याच्या चळवळीत आघाडीवर होती. एक भाग जिथे लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्ची बोलतात आणि दुसरा भाग जिथे मराठी आणि कोकणी बोलतात. 25 एप्रिल 1960 रोजी भारतीय संसदेने लागू केलेल्या बॉम्बे पुनर्रचना कायदा, 1960 नुसार, या चळवळीचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली.हा कायदा 1 मे 1960 रोजी अमलात आला.21नोव्हेंबर1956 दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्या मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संघटनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन समोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकांकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत. फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकत वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रही मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या नादात 106 आंदोलन हुतात्मे झाले. या हुतात्म्याच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर सन 1965 मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची स्थापना केली. हा दिवस मराठीपणाचा दिवस हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याशिवाय हा दिवस कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 ला देशाचा देशाला स्वातंत्र्य मिळाले. महाराष्ट्र राज्य मात्र स्वतंत्र नव्हते. भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता.हळूहळू देशातील राज्यभाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. अनेक प्रांतीय राज्य मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली. यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्यामुळे भाषावर प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली होती गुजराती भाषिकांनी स्वतःची वेगळी राज्य हवी होते तर मराठी भाषिक नागरिकाही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते.स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मितीची प्रक्रिया सुरू होती मात्र राज्य पुनर्रचना आणीबाणी मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिला होता त्यामुळे मुंबई मराठी माणसापासून तोडली जात असल्याचीं कुरकुर होती. त्यामुळे 21 नोव्हेंबर 1956 रोजी आंदोलकांनी तत्कालीन सरकारचा निषेध करत कामगारांनी मोर्चा काढला आंदोलकांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसरात धुवून गेला होता. पोलिसांना आवरणे कठीण झाले होते तेव्हाच गोळीबाराचा आदेश होऊन 106 आंदोलकांना हुतात्मा. महाराष्ट्र ही थोर महात्म्यांची भूमी आहे. जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकोबा पर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत, महात्मा फुले पासून डॉक्टर आंबेडकरा पर्यंत, अनेक थोरमंडळींचा जन्म झाला.पण आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली हे एक आहे.देशाला स्वातंत्र्य मिळालं भाषेचा प्रश्न होता अनेक राज्याचे एकाच राज्यात राहत होते पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली पण 106 आंदोलन हुतात्मे सुद्धा झाले. महाराष्ट्र राज्य म्हणजे मराठी भाषेचे राज्य.हे राज्य व्हावे ही इथल्या जनताजनार्दनाची फार वर्षापासून इच्छा होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्याचे आधीच भाषावर प्रांतरचनेचे महात्मा गांधी पासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्रचनेचे महत्त्व महात्मा गांधी पासून सर्वांनी आग्रहाने प्रतिवादीत केले.पुढे राज्य पुनर्रचनेतून निर्माण झालेल्या असंतोशात महाराष्ट्राचे 105 हुतात्मे बळी पडले. नकाशा पुढे पाहता भारताचा, महाराष्ट्र आधी भरे लोचनी अशी महाराष्ट्राची महती कवी यशवंत यांनी गायीले.तर महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले, अशी अभिमानाची ग्वाही सेनापती बापतांनी दिली आहे. मराठी भाषेचे राज्य आल्यावर आपल्या मातृभाषेला चांगले दिवस येतील. अशी केवळ अपेक्षाच नव्हे तर मराठी जनतेला खात्री वाटत होती. पारतंत्र्याच्या काळात, नसे आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा, असे भावपूर्ण स्वप्न माधव ज्यूलीयन यांनी शब्दबद्ध केले होते.मराठी भाषा मृत होऊ लागली आहे. मरू घातली आहे. असे अनेक शहाणेसुरते उघड उघड बोलू लागले. अरे गीतापदेशाच्या अमृताचा महाराष्ट्र शारदेवर महाभीषेक करणाऱ्या ज्ञानोबांनी या मराठीच्या बोलांनी आपण अमृताला ही पैजेवर जिंकू,अशी प्रतिज्ञा केली होती. अमृतालाही जिंकणारी भाषा मृत होईल?संतांनी लोकगीतापासून, ब्रह्म पदाचा मार्ग सांगणाऱ्या विचारगर्भ, अध्यात्मपर्यंत या मराठी भाषेचा मुक्त संचार सर्वत्र घडवीला. ही कधी पायात सुवर्णशब्दांचे नादमधुर पैजन बांधून लोकरंजनासाठी नाचली, तर कधी डफ तुनतू्नांच्या साथीने वीरांचे बाहूं स्फुरण पावण्यासाठी शाहीरांच्या विररसात न्हाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी या भाषेतच आपले लोक कल्याणाचे आदेश दर्याखोऱ्यात आणि खेड्यापाड्यात पोहोचले. मराठी भाषेने सप्तसुरांच्या नादात आणि नवरसांच्या रंगात इथला हेवा वाटावा. महाराष्ट्राच्या लेकरांनी मराठी भाषेची अनेकविध प्रकारे सेवा तर केली. पण हिंदी भाषेचा आद्य पत्रकारही मूळचा महाराष्ट्रीयन होता.गुजराती भाषेच्या व्याकरणाचे नियम करण्यात ज्याने फार मोठी कामगिरी बजावली, तो विद्वान ह्या मराठी भूमीचा पुत्र होता. स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे असे गर्जून सांगणारे नारकेसरी लोकमान्य या मराठी भूमीतच जन्माला आले. देशाला समानतेचा मंत्र देणारे फुले- आंबेडकर या महाराष्ट्रात निर्माण झाले. संगीतशास्त्राच्या क्षेत्रात आसे तुहिमाचल ज्यांची कारकीर्द गाजली, मौलिक स्वरूपाची ठरली ते पलूसकर, भातखंडे इथलेच. अहो बोलपटाची मुहूर्तमेढ रोववणारे दादासाहेब फाळके काय किंवा पहिले मराठी चित्रपटातील राष्ट्रपती पदक मिळवण्याचा पराक्रम आचार्य अत्रे काय, मराठी मातीचे सुपुत्र. देशाला प्रचलित काळानुसार धर्मशास्त्र समजावून सांगून धर्मसिंधु सारखा सर्वमान्य ग्रंथ लिहिणारे बाबा पाध्ये आपल्या पंढरपूरचे, किती नावे सांगावी? नाटक कंपनीबरोबर गावोगावी फिरून असंख्य हातांचे ठसे घेऊन त्रिरेखावेलाप्रबोध नावाचा लोकोत्तर ग्रंथ लिहिणारे ज. वा. जोशी इथलेच. केवळ मराठीतच नव्हे, तर इंग्रजी, गुजराती पासून हीब्रुपर्यंत विविध प्रकारचे टाईप तयार करणारे महर्षी जावजी दादाजी. कालमापनाच्या क्षेत्रात भारतीयांची कामगिरी विश्व भाषेतून मांडताना एका इंग्रजसाहेबाला सहाय्य घ्यावे लागले ते मराठी भाशिक ते मराठी भाषिक श. बा. दीक्षित यांचेच. यांचेच मराठी भाषिक कर्तुत्वाची ही केवळ एक झलक.इतक्या थोरांनी गौरवलेली भाषा मृत होणार असे आपण कसेम्हणू शकू? मराठी भिकारीन झाली, तरीही कुशीच्या तिच्या तीस केवी त्यजी या शब्दात मराठीला पुत्र मराठीला अंतर देणार नाहीत. अशी आत्मविश्वासपूर्ण भविष्यवानी माधव जुलियन यांनी कित्येक वर्षांपूर्वी वर्तवली होती. ती सार्थ आणि यथार्थ ठरेल. अशी अपेक्षा आपण यंदाच्या महाराष्ट्र दिनी बाळगूया.!!जय महाराष्ट्र!!
संकलन :-शेषराव गो. कडू
मो नं. 9923988734
वरुड

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या