वर्धा:- वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तिवसा येथे 116 वा ग्रामजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी भव्य तालुकास्तरीय सामुदायिक प्रार्थना ,सर्वधर्म संमेलन, सप्त खंजेरी वादक इंजि पवन दवंडे यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन तथा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रविण रामपुरे व प्रविण निपाने व सन्माननीय व्यक्तींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, सर्व प्रथम जम्मू काश्मीरमद्धे पहलगाम या ठिकाणी देशातील २८ नागरिकांनवर झालेल्या दहशदवादी हल्यात मृत्यु पावलेल्या भारतीयांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मानवता सर्वधर्म समभाव ग्रामविकास राष्ट्रभक्ती सर्व सामान्य लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आज देशाला गरज आहे. म्हणून देशाच्या राजधानीत दिल्ली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन घेण्याचा निर्धार करण्यात आला .कार्यक्रमाला अमरावती मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार बळवंतराव वानखडे. अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे तिवसा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सौ. प्रतिभाताई गौरखेडे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक गोपाल सालोडकर याप्रसंगी सर्वधर्म संमेलनाची गरज या विषयावर रविदादा मानव संचालक श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल मोझरी मोझरी, साहित्यिक सुवा मंचाचे ज्ञानेश्वर दादा रक्षक सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर चिंतन चेतन परळीकर यांनी मार्गदर्शन केले.यावेळी माजी समाज कल्याण सभापती दिलीपभाऊ काळबांडे, सर्व धर्म प्रतिनिधी हिंदू धर्म मनोहरराव साबळे, मुस्लिम धर्म शफीक शहा, शीख धर्म गुरुदेवसिंग बावरी, बौद्ध धर्म निळकंठराव खाकसे, जैन धर्म सचिन नागमोते, ख्रिश्चन धर्म शुभम पॉल,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक वैभव वानखडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवींद्र राऊत, सेतू देशमुख रुपालीताई काळे,रितेश पांडव प्रमुख उपस्थित होते यावेळी तालुक्यातील सर्व गुरूदेव सेवा मंडळाचे सेवक सर्व सरपंच, उपरपंच ग्रामपंचायत सदस्य मा. पंचायत समिती मा. जिल्हा परीषद सदस्य पत्रकार मंडळी उपस्थित होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच संस्थापक अध्यक्ष नगरसेवक तथा आरोग्य सभापती नगरपंचायत तिवसा अमर वानखडे यांनी केले सूत्रसंचालन साक्षीताई पवार कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद बोराळकर, प्रशांत सुरोसे, पंकज पांडे अनुप देशमुख पवन खरासे, रोशन ठाकरे, अतुल तिखे, जान्हवी राऊत, मोनिका बोराळकर, विकास बोरवार, विनोद बोराळकर, कुणाल राऊत, मोहन दरेकर त्रिशूल वानखडे, गणेश गहूकर, मंगेश राऊत, सर्वेश पोहनकर, संदीप बेलसरे ,सारंग हीवसे ,अनिकेत तालन देवानंद ठवळी, सोहम बेलसरे यांनी अथक परिश्रम घेतले.