spot_img

आष्टी तहसील कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांच्या धडक मोर्चा मा. बच्चुभाऊ कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग उपोषण च्या समर्थनार्थ धडक मोर्चा

आष्टी (शहीद)शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासह विविध १७ मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून बच्चू कडू यांनी गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आष्टी तालुक्यातील शेकडो शेतकरी आज तहसील कार्यालयावर धडकले. शेतकरी वर्गाने एकत्र येत राज्य शासनाचा निषेध नोंदविला. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करत कर्जमाफी करू, असे आश्वासन दिले होते. मात्र त्या आश्वासनाची अजूनपर्यंत पूर्तता केली नाही. मोझरी येथे सुरू असलेल्या बच्चूभाऊ कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समर्थन जाहीर केले. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी. दिव्यांग व विधवा महिलांना ६००० रुपये मानधन. हमीभावावर २०% अनुदान. ०७ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील इतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे. तरुणांच्या हाताला काम व योग्य दाम देण्यात यावे. रोजगार भरती करण्यात यावी. शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुरांना सुद्धा आर्थिक सहाय्य देण्यात यावे. शेतमजुरांकरीता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे. शहराप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा घरकुलाला ५ लाख अनुदान देण्यात यावे. मेंढपाळ, मच्छीमार , ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या अशा एकूण १७ मागण्यांचे समर्थन करण्याकरिता आज तहसील कार्यालय आष्टी येथे शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या