*आष्टी (शहिद) :-*
आष्टी येथील प्रसिद्ध आराधना नाट्य मंडळ अंतर्गत कार्यरत असलेल्या क्रांती ज्ञानपीठ शाळेत रा. प. म. तळेगाव आगाराच्या आगार व्यवस्थापक आनंदी बेलुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्याबाई होळकर मोफत पास चे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विजय सव्वालाखे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष सुमेध धोंगडी,तसेच रा.प.म.तळेगाव आगारातील कर्तव्यदक्ष वाहतुक नियंत्रक अमर जसुदकर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका निलीमा ठाकरे मंचावर उपस्थित होत्या.
आष्टी येथील प्रसिद्ध क्रांती ज्ञानपीठ शाळेत बाहेरगावावरून येऊन शिक्षण घेत असलेल्या असलेल्या विद्यार्थीनींना अहिल्याबाई होळकर मोफत पास योजने अंतर्गत मोफत पास चे वितरण करण्यात आले.
यावेळी रा. प. म. तळेगाव आगाराच्या आगार व्यवस्थापक आनंदी बेलुरकर आणि वाहतुक नियंत्रक अमर जसुदकर यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यार्थीनींना मोफत पास वितरण झाल्यामुळे विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणीत झाला होता. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी आगार व्यवस्थापक आनंदी बेलूरकर तसेच वाहतुक नियंत्रक अमर जसुदकर यांचे आभार मानले.
कार्यक्रमाला शाळेच्या उपमुख्यध्यापिका वंदना लेकुरवाळे यांच्या सह शाळेतील सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.