spot_img

आर्वी शहरातील पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ.प) च्या महिला आघाडी द्वारा उघड्या पाईपच्या कॅप वाटप*

आर्वी:- आर्वी शहरासह ग्रामीण भागात नुकतेच अजितदादा पवार विचाराच्या
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून आर्वी विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी आर्वी यांचे शुभ हस्ते जल हेच जीवन या ब्रीद वाक्याचा तसेच स्थानिक पातळीवर असलेल्या समस्या समजून घेत आहेत, ज्या समस्या शासनाने सोडवाव्या त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा-आणि ज्या प्रशासन स्तरावर सोडवायच्या त्यासाठी प्रशासना सोबत सलोख्याने चर्चा करून सर्व बाबीची पूर्तता करून प्रसंगी नागरिकांसह कार्यालयाचे उंबऱ्यावर जाऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नरत आहेत, अनेक भागात नागरिकांत जागृतीची देखील गरज असल्याच लक्षात आलं असता, जागृती निर्माण व्हावी. म्हणून देखील पुढील काळात होईल तितके प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल असा ध्यास पदाधिकारी यांनी घेतला आहे, याचाच प्रत्यय महिला आघाडी द्वारा आर्वी शहरातील समस्याचा आढावा घेत असताना, आर्वी शहरातील अनेक भागात पाण्याचा अपव्यय होत आहे, कुठे पाण्याचा लिकेज असल्यामुळे पाणी नाहक वाया जातं आहे तर, कुठे नागरिकांच्या नळाना कॅप-तोट्या नसल्याने वापरण्याच पाणी झाल्यावर कितीतरी पाणी अक्षरशः वाहून जाते, याच पाण्यासाठी उन्हाळ्यात संघर्ष उभा ठाकतो तर आज पाणी मिळत आहे तर त्याचा मोठा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले आणि हे थांबवण्यासाठी आणि जागृती होण्याच्या दृष्टीने आर्वी शहरातील प्रभाग क्रमांक 4 येथील मायबाई वॉर्ड कसबा येथील वस्तीत अनेक नळांना तोट्या च नसल्यान या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या महिला आघाडी च्या वर्धा जिल्हा उपाध्यक्षा शुभांगी कलोडे, आर्वी तालुका अध्यक्षा माधुरी सपकाळ, रोजगार व स्वयं रोजगार विधानसभा अध्यक्षा सोनाली जैन,आर्वी शहर अध्यक्षा सीमा डहाके, आर्वी शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर,यांच्या पुढाकारात आर्वी शहर कार्याध्यक्षा दीपा वाकोडे, प्रभाग क्र 4 अध्यक्षा मोनाली लांडगे प्रभाग क्र 5 अध्यक्षा शिल्पा इखार, प्रभाग क्र 2 अध्यक्षा स्वाती माकोडे, भारती पोटफोडे, वासुदेवराव सपकाळ यांनी स्व खर्चातून उघळ्या नळा ना प्रत्यक्ष प्रभागात जाऊन कॅप लावल्या नागरिकांशी संवाद साधला पाणी हे जिवन आहे पाण्याच महत्व समजावलं तसेच पुन्हा तोट्या हरवल्यास तोट्या लाऊन घ्या पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत विनंती करण्यात आली यावेळी मिराताई प्रधान गीताबाई लांडगे, रेखाबई गायकवाड, सुनीताबाई कांबळे बेबीबाई लांडगे,इत्यादी उपस्थित होते

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या